पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना फोन करुन प्रकृतीची विचारपूस केली आहे. दिलीप वळसे पाटील हे त्यांच्या घरी पाय घसरुन पडले होते. यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांनी देखील दिलीप वळसे पाटील यांच्याशी संवाद साधत प्रकृतीची विचारणा केली.
दिलीप वळसे पाटील हे त्यांच्या घरात पाय घसरून पडले होते. त्यामुळं वळसे पाटील यांच्या खुब्याला मार आणि हाथ फ्रॅक्चर झाला होता. यानंतर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दिलीप वळसे पाटील यांना दाखल करण्यात आलं होतं.
महाराष्ट्र राज्याचे सहकार दिलीपराव वळसे पाटील हे काल 27 मार्च 2024 रोजी रात्री 11.45 वाजता घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या डाव्या मांडीचे हाड व डाव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती अस्थिरोग तज्ञ डॉ.निरज आडकर व हृदयरोग तज्ञ डॉ. सदानंद राऊत यांनी काल दिली.
शरद पवार यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील यांच्याशी फोनवरुन संवाद साधला अशी माहिती आहे. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांनी देखील दिलीप वळसे पाटील यांच्याशी संवाद साधत फोनवरुन प्रकृतीची विचारपूस केली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याशी संवाद साधत शरद पवारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कशी जपायची हे दाखवून दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट तरीही संवाद सुरु
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 जुलै 2023 रोजी फूट पडली त्यावेळी शरद पवार यांचे मानसपूत्र म्हटले जाणारे दिलीप वळसे पाटील अजित पवारांसोबत गेले होते. अजित पवारांसोबत गेलेलेअनेक नेते शरद पवारांना भेटणं टाळतात. मात्र, दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकांच्या निमित्तानं आमने सामने येत असतं. राष्ट्रवादीतील फुटीनंतरही दिलीप वळसे पाटील शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं पुण्यात मोदीबागेत गेले होते.
संबंधित बातम्या :