पुणे : शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर जाहीर करण्यात आली आहे. यात नऊ मतदार संघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेल्या शिरुर मतदार संघातून अमोल कोल्हेंना (Amol Kolhe) उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिरुरमध्ये आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी लढत होणार आहे. आढळराव पाटलांच्या नावाची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. मात्र त्यांच्या नावाचीच घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. आता शिरुरमध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट रिंगणात उतरणार आहेत. 


शरद पवारांचे आभार मानले!


उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमोल कोल्हेंनी शरद पवारांचे आभार मानले, म्हणाले की,'आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि आमच्या लोकसभेतल्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांचा मनापासून मी आभार मानतो आणि त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचे सुद्धा आभार मानतो कारण 2019 मध्ये माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यानंतर गेली पाच वर्षाच्या सातत्याने लोकसभा मतदारसंघाचे जे प्रश्न मांडत राहिलो ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करू शकलो मला वाटतं की हा पुन्हा पवार साहेबांनी जो विश्वास माझ्यावर ठेवलाय हा विश्वास सार्थ करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन .महविकास आघाडीचे सगळेच तगडे उमेदवार आपल्याला रिंगणात दिसतील आणि त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परफॉर्मन्स या लोकसभा निवडणुकीत आपण मी कायम  अस म्हणतो की wait and watch असा परफॉर्मन्स पाहायला मिळेल, असा विश्वास अमोल कोल्हेंनी व्यक्त केला आहे. 


कोण आहेत अमोल कोल्हे?


-शिरुरची उमेदवारी मिळालेले अमोल कोल्हे हे पेशाने डॉक्टर आहेत.


-पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे त्यांचा जन्म झाला. 


-बारावी पर्यंतचं शिक्षण पुण्यात तर वैद्यकीय शिक्षण (MBBS) त्यांनी मुंबईत घेतलं आहे.
-डॉक्टर झाल्यावर त्यांनी पुण्यात प्रॅक्टिसदेखील केली
 -मात्र त्यात ते रमले नाही आणि त्यांनी अभिनय करण्याचा निर्णय घेतला. 
-अनेक मालिका आणि नाटकांमधून काम केले.
-झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेने ते प्रसिद्धीस आले. 
-2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. 
-ते शिवसेनेचे त्यावेळचे स्टार प्रचारच होते.
-2019 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादीत प्रवेश घेतला.
-2019 मध्ये त्यांना अजित पवारांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली होती. 
-त्यावेळी त्यांनी घोड्यावरुन प्रचार केल्यानं ते चर्चेत आले होते. 
-2019 सलग तीन टर्म खासदार राहिलेले शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला.
-2019 मध्ये  शिरुर मतदारसंघातील एकूण 12 लाख 86 हजार 226 मतांपैकी अमोल कोल्हे यांना 6 लाख 34 हजार 108 मते (49.19 टक्के) मते मिळाली होती. शिवाजीराव आढळराव पाटील यांना 44.63 टक्के म्हणजे 5 लाख 75 हजार 279 मतं मिळाली होती.


शिरुरमध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट


अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणार, असा निर्धार अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे अमोल कोल्हेंविरुद्ध आढळराव पाटलांना उमेदवारी देणार आहे. शिरुर मतदार संघाची राज्यात चांगलीच चर्चा रंगली. या मतदार संघाची निवडणूक अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. अमोल कोल्हेंनी प्रचाराला दणक्यात सुरुवात केली आहे. आढळराव पाटीलदेखील खासदार राहिलेले आहेत. त्यामुळे शिरुरचं मैदान नेता खेचणार की अभिनेता हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 


 



कोणाला कोठून उमेदवारी 


वर्धा     - अमर काळे
दिंडोरी   - भास्करराव भगरे
बारामती -सुप्रिया सुळे
शिरुर- डॉ. अमोल कोल्हे
अहमदनगर- निलेश लंके



इतर महत्वाची बातमी-