पुणे : राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेली थट्टा यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बाबा आढाव हे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरुवारी (28 नोव्हेंबर) महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरू केलं आहे. बाबा आढाव यांचे आत्मक्लेश उपोषण तीन दिवसांपासून सुरू आहे. त्यांच्या उपोषण स्थळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भेट दिली. त्याचबरोबर त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, 'निवडणुकांमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर या गोष्टी यापूर्वी कधीही बघितल्या नव्हत्या'. 


बाबांनी उपोषण सुरू केलं आहे. ते या आत्मक्लेश उपोषणाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. लोकांच्या चर्चाही होती. कालच्या ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापौर या गोष्टी यापूर्वी कधीही बघितल्या नव्हत्या. स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असतात, त्या ठिकाणी असे कुठेतरी ऐकायला मिळतं असं नाही. परंतु संपूर्ण राज्याच्या आणि देशाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून संपूर्ण यंत्रणाच हातात घेतली हे चित्र यापूर्वी दिसलेलं नव्हतं, पण हे आता महाराष्ट्रात बघायला मिळालं. आता त्याचा परिणाम लोकांच्या अस्वस्थता वाढली आहे. लोकांच्यातली चर्चा आहे, असंही शरद पवार यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणालेत. 


आज कुणीतरी अशा रीतीने पाऊल प्रभावी पाऊल टाकण्याच्या आवश्यकता आहे. हा लोकांच्यातील चर्चेचा सूर आहे, आणि त्याच्यात माहिती कळली बाबा आढाव यांनी पुढाकार घेतला, आणि ते स्वतः महात्मा फुले यांच्याशी संबंधित वास्तूमध्ये ते बसलेले आहेत. एक प्रकारचा दिलासा बाबांच्या या उपोषणाने सामान्य लोकांच्या येतोय असं मला स्पष्ट दिसते. पण, त्यांनी आज राष्ट्रीय कर्तव्य आणि देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली. पण त्यांनी एकट्यानेच ही भूमिका घेणे हे काय सोयीचा नाही. त्यांनी एक प्रकारे जनतेचा उठाव या माध्यमातून केला आहे. संसदीय लोकशाही पद्धती ही उध्वस्त होईल असे चित्र आज या ठिकाणी दिसते. देशाची सूत्र आज ज्यांच्या हातात आहेत त्यांना याची काही पडलेली नाही इतकी चर्चा संबंध देशात आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.


राज्यात आणि देशात सुरू असलेल्या प्रकाराबाबत संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहांमध्ये विविध पक्षांनी केला. तर त्यांना बोलून द्यायचं नाही. सहा दिवसाच्या अधिवेशनामध्ये रोज सकाळी 11 वाजता विरोधी पक्षांनी ते दोन्ही सभागृहामध्ये आमचं म्हणणं मांडायला संमती द्या, अशी मागणी करत आहेत. ती मागणी एकाही वेळेला सहा दिवसात मंजूर झालेली नाही. या सहा दिवसांमध्ये एकदाही संमती मिळू शकली नाही, याचाच अर्थ देशाच्या संसदीय लोकशाहीवरती आघात ते करत आहेत, आणि यासाठी लोकांच्यात जावं लागेल. लोकांना जागृत करावे लागेल. लोक जागृत आहेत त्यांची उठाव केला पाहिजे. त्याची आवश्यकता आहे हे बाबांच्या उपोषणांने स्पष्ट झालेलं आहे. सत्तेचा गैरवापर आणि भल्या भल्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी आज या ठिकाणी दिसतात याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही पण आज जे प्रश्न उपस्थित झाले त्यांची नोंद आपल्याला घ्यावी लागेल असं शरद पवार म्हणालेत.