पुणे: बदलापूर अत्याचार (Badlapur Crime) प्रकरणाने अख्ख राज्य हादरलं आहे. महिलावर्ग स्वतःला असुरक्षित समजू लागलाय, पुरुषांची मानसिकता अन वाढत चाललेली विकृती याला कारणीभूत आहे. हाच प्रश्न एका विध्यार्थीने थेट शरद पवारांसमोर (Sharad Pawar) उपस्थित केला. शालेय शिक्षणात मूल्य शिक्षणावर भर देता येईल का? यावर शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांचं परखड मत मांडलं. ज्या घृणास्पद घटना घडल्या त्या सर्वांसमोर आहेत. तातडीनं पावलं उचलणं गरजेचं असतं, जे होताना दिसलं नाही. एक धाक निर्माण करायला हवा. हे बोलताना पुरुषांच्या मानसिकतेवर पवारांनी (Sharad Pawar) ही खंत व्यक्त केली. आता यापुढं मुलींनी आत्मविश्वासाने अन कणखरपणे उभं व्हावं, तुमच्या हातात आलं तर तुम्ही सगळं करून दाखवलं आहे. असं म्हणत पवारांनी (Sharad Pawar) तरुणींना न घाबरण्याचा सल्ला दिला आहे. 


काय म्हणाले शरद पवार?


ज्या घृणास्पद घटना घडल्या त्या सर्वांसमोर आहेत. तातडीनं पावलं उचलणं गरजेचं असतं, जे होताना दिसलं नाही. एक धाक निर्माण करायला हवा. यापुढं मुलींनी आत्मविश्वासाने अन कणखरपणे उभं व्हावं, तुमच्या हातात आलं तर तुम्ही सगळं करून दाखवलं आहे, असंही शरद पवारांनी (Sharad Pawar) यावेळी म्हटलं आहे. 


अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट


आज शरद पवार (Sharad Pawar) हे उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुका दौऱ्यावर आहेत. शरद पवारांचा (Sharad Pawar) जुन्नर तालुक्यातील दौरा सुरू असताना कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी भेट घेतली असून जुन्नरच्या राजकारणात ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे. आज झालेल्या या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अतुल बेनके (Atul Benke) तुतारी हाती घेणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


अतुल बेनकेंची शरद पवारांसाठी फ्लेक्सबाजी


आमदार अतुल बेनकेंनी (Atul Benke) आता थेट शरद पवारांच्या (Sharad Pawar) स्वागतासाठी फ्लेक्स झळकवले आहेत. आज जुन्नर विधानसभेत शरद पवार  (Sharad Pawar) आलेत, त्यांचं स्वागत अजित पवारांचे आमदार अतुल बेनके यांनी केलं आहे. इतकंच नव्हे तर नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राची पाहणी करण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar)  पोहचले, तेंव्हा स्वतः बेनके (Atul Benke) तिथं हजर होते.