पुणे : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा(Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यातच आरक्षणासाठी राज्यात मराठे एकवटले आहे. त्यांनी अनेक ठिकाणी गावबंदीदेखील केली आहे. त्याच दरम्यान फक्त मराठवाड्यातील नाही तर सर्व मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचं मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात 23 बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे कोर्टात टिकणारे आरक्षण आणि क्युरेटीव्ह पीटीशन जिंकायची आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले.
शंभूराज देसाई म्हणाले की, मराठा आरक्षण 2019 मध्ये मिळालं. कायदेशीर बाबी तपासून आरक्षण दिलं पण आरक्षण सुप्रीम कोर्टात का टिकलं नाही याबद्दल कोणी बोलत नाही. सुप्रीम कोर्टात ज्या गोष्टी गेल्या पाहिजे त्या का नाही गेल्या याचे कारण शोधलं पाहिजे. यंदा टिकणारं अरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.
मनोज जरांगे यांच्या संदर्भात आज मंत्री शंभूराज देसाई यांना प्रश्न विचारला असता शंभूराज देसाई म्हणाले, "आज मनोज जरांगे पाटील हे म्हणत आहेत ज्या दिवशी ते उपोषणाला बसले तेव्हा मंत्री गिरीश महाजन त्यांच्याशी बोलले होते. ज्येष्ठ मंत्री म्हणून त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या राज्य सरकारच्यावतीने त्यांना विनंती केली तुम्ही उपोषण स्थगित करा त्यांनी नाही केलं आणि त्यानंतर ते म्हणले कोणी ही गावात येऊ नका."
"आम्ही सुद्धा मराठा समाजाचे आहोत. जर पाटील साहेब आत्ता म्हणत असतील की सरकारने तयारीने यावे तर एकदा नाही दहादा आमची त्यांच्यासोबत चर्चा करण्याची तयारी आहे. आंदोलन सुरू करण्यापूर्वी वर्षा निवासस्थानी जरांगे पाटील आणि आमची बैठक झाली होती त्यांना त्यावेळी गोष्टी सांगितल्या होत्या. सरकारची त्यांच्याशी केव्हा ही चर्चा करण्याची तयारी आहे" असं वक्तव्य केलं आहे.
मराठा मोर्चाच्या आंदोलनाला खासदार संजय राऊत यांनी मुक मोर्चा म्हणून संबोधलं होतं. हे निंदनीय होतं. मराठा समाजातील लहान मुलगाही संजय पाटलांचं हे वक्तव्य सहन करणार नाही. मराठा आरक्षणासंदर्भात संजय राऊत यांनीदेखील समजूतदार भूमिका घेतली पाहिजे. ते देखील खासदार आहेत. त्यांनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी संजय राऊत यांना दिला आहे.
हेही वाचा :
Kerala Blast: केरळमध्ये मोठा स्फोट, एकाचा मृत्यू, 35 जण जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भिती