पुणे : पुण्यातील संगीतप्रेमी यांची प्रतीक्षा संपली आहे. पुणेकरांचा (Sawai Gandharva Mahotsav Pune 2023) आणि त्यातच संगीतप्रेमींचा सगळ्यात आवडत्या महोत्सवाची आजपासून सुरुवात होणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव मागील 69 वर्षांपासून आयोजित करण्यात येतो. अनेक वर्ष दिग्गज कलाकारांनी हा मंच गाजवला आहे. यावर्षी 13 ते 17 डिसेंबर 2023 दरम्यान हा दैदीप्यमान सोहळा संपन्न होणार आहे. मुकुंदनगरमधील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुलात हा महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.
कोणते दिग्गज लावणार हजेरी?
13 डिसेंबर 2023। दुपारी ३ वाजता
तुकाराम दैठणकर आणि सहकारी - सनई
संजय गरूड - गायन
कलापिनी कोमकली - गायन
पं. तेजेंद्र नारायण मजुमदार - सरोद पं. उल्हास कशाळकर - गायन
भीमसेन महोत्सव
14 डिसेंबर 2023| दुपारी 4 वाजता
अंकिता जोशी - गायन
पं. उपेंद्र भट - गायन
पार्था बोस - सतार
विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे - गायन
15 डिसेंबर २०२३ | दुपारी 4 वाजता
रजत कुलकर्णी - गायन
श्रीमती पद्मा देशपांडे - गायन
नीलाद्री कुमार - सतार
पं. अजय पोहनकर आणि अभिजित पोहनकर - गायन
16 डिसेंबर 2023| दुपारी 4 वाजता
प्राजक्ता मराठे - गायन
देबप्रिय अधिकारी व समन्वय सरकार - गायन आणि सतार श्रीमती यामिनी रेड्डी - कुचीपुडी
अभय सोपोरी - संतूर
बेगम परवीन सुलताना - गायन
17 डिसेंबर 2023 | दुपारी 12 वाजता
श्रीनिवास जोशी - गायन श्रीमती पौर्णिमा धुमाळे - गायन
पं. सुहास व्यास - गायन
ऐश्वर्या वेंकटरामन आणि सहकारी - कर्नाटक शास्त्रीय संगीत कौशिकी चक्रवर्ती - गायन
पं. रोणू मजुमदार - बासरी
डॉ. प्रभा अत्रे - गायन
महोत्सवासाठी येणाऱ्या रसिकांच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांसाठी सुसज्ज पार्किंग, कार्यक्रमाचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना घेता यावा यासाठी नेहमीप्रमाणे मोठ्या एलईडी स्क्रीन्स, अल्पोपहाराची सोय असणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आदी सुविधा महोत्सवाच्या ठिकाणी असणार आहेत. शिवाय मंडपाच्या एका बाजूस संगीत क्षेत्राशी संबंधित विविध उत्पादनांचे तर एका बाजूला प्रायोजकांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. पुरुष आणि महिलांसाठी प्रसाधनगृह मंडपाच्या मागील बाजूस उभारण्यात आले आहे.