पुणे : ड्रगमाफिया ललित पाटील हा श्रीलंकेत (Sasoon Hospital Drug Racket)   पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलीस त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना त्याने खळबळजनक विधान केलं आहे. मी ससून रुग्णालयातून पळालो नाही तर मला पळवलं गेलं, असं विधान करुन त्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या या विधानामुळे मात्र ससूनचे अधिकारी, येरवडा कारागृहातील प्रशासन आणि पुणे पोलिसांची चांगलीच धाकधुक वाढली आहे. मात्र ललित पाटीलनं हे विधान स्वत:चा बचाव करण्यासाठी केलं असावं, अशी शक्यता आहे. 


(ही ब्रेकिंग न्यूज आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.. हे पेज रिफ्रेश करत राहा)