पुणे : ड्रॅग्ज माफिया ललित पाटीलचा (Lalit Patil) भाऊ भूषण पाटील (Bhushan Patil) आणि त्याच्या (Sasoon Hospital Drug Racket) साथीदार अभिषेक बलकवडे यांना पुणे पोलसांनी नेपाळच्या सीमेवरून अटक केली आहे. काल रात्री (10 ऑक्टोबर) उशिरा त्यांना विमानाने पुण्यात आणण्यात आलं आहे. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. या दोघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांच्या कोठडीवरुन न्यायाधीशांनी पोलिसांना चांगलंच खडसावलं आहे. इतके दिवस ललित पाटील तुमच्या ताब्यात असताना त्याला नीट सांभाळता आलं नाही आणि आता भूषण आणि अभिषेककडे आता काय तपास करणार,असं म्हणत पोलीस कोठडीची मागणी करणाऱ्या पोलीसांना न्यायाधीशांनी संतप्त होऊन पोलिसांना सुनावले.
ललित पाटील पळून गेल्याने मागील काही दिवसांपासून पोलीस खात्यावर आणि त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्यामुळे पोलीस कोठडी मागू नका, असंही यावेळी न्यायाधीशांनी म्हटलं. यावेळी भूषण आणि अभिषेक या दोघांना न्यायालयाने तुमचे वकील कोण? असे विचारले असता आम्ही वकील दिलेले नाहीत, असं त्यांनी न्यायाधीशांना सांगितलं. त्यानंतर न्यायाधीशांनी या दोन आरोपींना सरकारी खर्चातून वकील देण्याचे आदेश दिले. न्यायालयात हजर असलेल्या वकिलांना तुमच्यापैकी कोणी या दोन आरोपींचे वकीलपत्र घेण्यास तयार आहे का? असं विचारलं. त्यानंतर न्यायालयात उपस्थित एक वकील आरोपींचे वकीलपत्र घ्यायला तयार झाले आहे.
भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी
भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना पोलीसांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. मात्र पोलिसांनी 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. कोणत्याही आरोपीला जास्तीत जास्त 14 दिवस पोलीस कोठडी देता येते. त्यामुळे ललित पाटील जेव्हा पकडला जाईल तेव्हा त्याच्यासोबत भूषण आणि अभिषेकची एकत्रित चौकशी करायची असेल तर त्याची 14 दिवसांची पोलीस कोठडी एकाचवेळेस संपवू नका, असं न्यायाधिशांनी पोलिसांना सांगितलं आहे.
ललित पाटील ड्रग्ज डिल करायचा...
भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे हे दोघे ललित पाटीलसोबत ड्रग्ज रॅकेट चालवत होते. त्यात ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील हा ड्रग्ज तयार करण्यात माहिर होता. त्यानं मेफेड्रोन ड्रग्ज कसं तयार करतात याचं प्रशिक्षण घेतलं होतं. त्यानंतर हेच मेफेड्रोन अभिषेक बलकवडे भारतभर आणि भारताबाहेर विकायचा. या सगळ्या मेफेड्रोनचं डिल हे ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयात बसून करत होता.
इतर महत्वाची बातमी-