Sanjog Waghere on Maval Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात तिसऱ्या टप्प्यात पुणे, मावळ आणि शिरुरसह 11 जागांवर मतदान पार पडले. मावळमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना होत असल्याने अवघ्या पुण्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.


महायुतीकडून शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरे गटाचे संजोग वाघेरे असा सामना रंगला आहे. मावळमध्ये 54.87 टक्के मतदान झालं असून सर्वाधिक मतदान उरण विधानसभा मतदारसंघातून 67.07 टक्के झालं आहे, तर सर्वात कमी 50.05 टक्के पनवेल विधानसभा मतदारसंघातून झालं आहे. मावळ लोकसभेला विजय शिवसेनेचाच विजय होणार असला, तरी ठाकरे की शिंदे याचं उत्तर 4 जून रोजी मिळणार आहे.



संजोग वाघेरेंचा मावळ लोकसभेला विजयाचा दावा


दरम्यान, मावळ लोकसभेला ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी विजयाचा दावा केला आहे. तसेच प्रतिस्पर्धी श्रीरंग बारणे यांना कोणत्या मतदारसंघात लीड मिळेल यांचंही भाकित केलं आहे. मावळ लोकावेसभेत 1 लाख 72 हजार 704 मतांनी विजय होईल, असा विश्वास मविआचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला आहे.


वाघोरे यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय मताधिक्याचा लेखाजोखा मांडला आहे. यामध्ये सलग दोनवेळा खासदार झालेल्या श्रीरंग बारणेंना फक्त पनवेलमधून लीड मिळेल, असा दावा वाघेरे यांनी केला आहे. त्यामुळे वाघोरे यांनी केलेला दावा खरोखर सत्यात उतरणार की बारणे तिसऱ्यांदा बाजी मारणार? यासाठी आता 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे.


मावळला कोणत्या मतदारसंघात किती मतदान?


दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड, पिंपरी या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. पनवेलमध्ये 50.5 टक्के मतदानाची नोंद झाली आहे, तर सर्वाधिक 67.07 टक्के मतदान उरण मतदारसंघात झालं आहे.



  • पनवेल 50.05 टक्के

  • कर्जत 61.40 टक्के 

  • उरण 67.07 टक्के 

  • मावळ 55.42 टक्के

  • चिंचवड 52.20 टक्के

  • पिंपरी 50.55 टक्के  


इतर महत्वाच्या बातम्या