Pune Sadabhau Khot : सध्या सुरु असलेल्या राजकारणात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांची जीभ घसरली. राज्यकर्ते रेड्यांची औलाद आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. पुण्यात (Pune) अर्हम फाऊंडेशन आणि वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी हा कार्यक्रम पुण्यात आयोजित केला होता. पुण्यातील एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या संवाद या कार्यक्रमात सदाभाऊ यांनी जीभ घसरली. 


मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक विषयांवरुन राजकरण पेटलं आहे. त्यात अनेक राजकीय नेते देखील वादग्रस्त वक्तव्य करत आहे. त्यांच्यामुळे रोज नवे वाद निर्माण होत आहे. याच वादात आता सदाभाऊ खोत यांचीही भर पडली आहे. राज्यकर्त्यांना डोक्याची भीती वाटत असते कारण जिकडे जास्ती डोकी तिकडे सगळे राज्यकर्ते बोलायला लागतात. राज्यकर्त्यांना बोलायला लावायचं असेल तर आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखे रेड्याच्या पाठीवर हात ठेवावे लागतील. कारण राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद असते. त्यांच्या पाठीवर हाथ ठेवल्याशिवाय ते बोलत नाहीत. अशा शब्दात खोत यांनी राजकीय नेत्यांवर निशाणा साधला आहे.


2015 मध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक घेतली होती. त्यात विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात आला होता. अभिमन्यू पवार यांनी फडणवीस यांच्याशी बोलून आताही तशीच बैठक घ्यावी, असंही ते म्हणाले. वन स्टेट वन एक्साम घ्यायला हव्यात. त्यात ग्रामसेवक, तलाठी, प्राध्यापक आणि शिक्षक सगळ्याच भरती एमपीएससीच्या छताखाली यायला हव्यात. यामुळे नोकरीच्या संधी बरोबरच गुणवत्ता मोठ्या प्रमाणात तयार होईल, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. शिवाय विद्यार्थ्यांच्या वयाचा देखील विचार व्हायला हवा. त्याचं नुकसान होता कामा नये, असं ते म्हणाले


देवेंद्र फडणवीसांनी बैठक घेतल्यास प्रश्न मार्गी लागतील
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. लाखो विद्यार्थी आशेने या परीक्षेचा अभ्यास करतात. त्यांची निवड होऊनही काही कामं अर्धवट राहत आहेत. हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने मदत केली पाहिजे. विद्यार्थ्यांचं वय वाढत आहे. 50 टक्के मंत्र्याचे काम हा अधिकारीच करत असतो. त्यामुळे दोघांनीही यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यात सगळ्या महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांना या सगळ्यांचे प्रश्न माहिती आहे. त्यामुळे त्यांनी तातडीची बैठक घेऊन या विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावायला हवेत, असंही ते म्हणाले.