Pune Accident News: पुण्यातील एका तरुणाचा सिंहगड ट्रेक  करताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सिंहगडावरील कल्याण दरवाजाजवळील पदपथावर ही घटना घडली. हेमंत गाला असे या घटनेत मृत्यू झालेल्या ट्रेकरचे नाव आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून परिसरात धुके पसरले होते. बराच वेळ गडावर ट्रेकिंग करणाऱ्या हेमंतशी संपर्क होऊ शकला नाही.


हेमंत बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. रात्री उशिरा किल्ल्याची झडती घेतली असता ही बाब उघडकीस आली. सिंहगड किल्ल्यातील कल्याण दरवाजाजवळील तटबंदीच्या पायथ्याशी असलेल्या पदपथावर दगड पडला. पावसाळ्याचे दिवस असल्याने दिवसभर धुके असते. सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला.


या घटनेत चार ते पाच ट्रेकर्स बचावले आहेत. मात्र, हेमंत गाला या ट्रेकरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शी स्वयंसेवकांमुळे गडावर आलेले इतर ट्रेकर्स आणि नागरिकांना घटनेची तत्काळ माहिती मिळाली. गडावर सकाळी 6 वाजता सिंहगड एथिक्स ट्रेक करण्यात आला. यात सुमारे तीनशे जणांनी सहभाग घेतला. सिंहगडाच्या पायथ्याशी आतकरवाडी-गोळेवाडी चौक-कौंडणपूरफाटा-कंडणपूर-कल्याण-कल्याण दरवाजा-नरवीर तान्हाजी मालुसरे समाधी-पुणे दरवाजा-गडीतळ-आतकरवाडी असा स्पर्धेचा मार्ग होता. पावसाळ्याला सुरुवात होत असताना अनेक ट्रेकर्सची धाव पुणे शहराच्या शेजारी असलेल्या अनेक गडकिल्ल्यांवर होते. मात्र याच काळात अपघाताचं प्रमाण जास्त असतं. किल्यावरील धुके आणि घसणामुळे होणाऱ्या अपघाताचं प्रमाण इतर अपघातांपेक्षा जास्त आहे.


लोणावळ्यात मृतदेह आढळला होता
दिल्लीहून लोणावळ्याला सहलीसाठी आलेला तरुण 20 मे रोजी बेपत्ता झाला होता. मागील तीन दिवसांपासून त्याचा शोध सुरु होता. अखेर आज त्याचा मृतदेह लोणावळ्याच्या जंगलात सापडला होता. फरहान शहा असं या मृत तरुणाचं नाव आहे. तो दिल्लीहून लोणवळ्यात सहलीसाठी आला होता. फिरायला गेल्यानंतर तो हरवला. लोणावळा पोलीसांसह इतर काही स्थानिक पथकांनी त्याचा शोध घेतला तेव्हा तो मृतावस्थेत सापडला.