पुणे : बारामती लोकभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) दणक्यात प्रचाराला लागल्या आहेत. बारामतीकरांनी आतापर्यंत पवारांनाच मतदान केलं होतं. यावेळीही तेच करायचं आहे. आतापर्यंत वडिलांना म्हणजे पवारसाहेबांना, मुलाला म्हणजे मला, मुलीला म्हणजे सुप्रिया सुळेंना मतदान केलं. आता सुनेला मतदान करायचं आहे, असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर बोलताना पवारांनाच मतदान करा हे अजित पवारांचं मत योग्य आहे, पण मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार हे वेगवेगळे आहेत असा टोला शरद पवारांनी अजित पवारांना लगावला होता. पवारांनी केलेल्या या वक्तव्यावरुन आता राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनीदेखील (Rupali chakankar) या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. राज्यात आधीच कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण जास्त असताना ही अशी वक्तव्य करणं चुकीचं आहे. असे विधानं ऐकले की राज्यातील सुनांना त्यांचं घर कोणतं?, असा प्रश्न पडत असेल, असं त्या म्हणाल्या.
रुपाली चाकणकर नेमकं काय म्हणाल्या?
शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याची आता भीती वाटायला लागली आहे. साधारण राज्यात कौटुंबिक हिंसाताराचं प्रमाण खूप आहे. त्यात सुनेला रोज नवे ताने ऐकावे लागतात. आता शरद पवारांच्या वक्तव्यामुळे या सगळ्यात भर पडली आहे. तू बाहेरची आहेस, या वाक्याची आता कौटुंबिक हिंसाचारात भर पडतेय की काय?, असा प्रश्न निर्माण झाला आहे, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
यासोबतच चाकणकरांनी खासदार अमोल कोल्हेंवरदेखील जहरी टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, शरद पवारांच्या बाजूला बसलेल्या लोकांचा देखील निषेध करते. अमोल कोल्हे एक कलाकार आहेत शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यंची भूमिका केली आहे साहेबांनी विधान केल्यावर राक्षसी हस्य करत अमोल कोल्हे यांनी साथ दिली. याच्या या अशा वक्तव्याने राज्यातल्या सुनांना आता प्रश्न पडत आहे की आमचं घर कोणतं आहे?, असंही त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना त्यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. आपल्या संसदरत्न खासदारांनी ही मुलाखत बघितली नाही असं त्या म्हणाल्या हा तर लबाडी आणि ढोंगीपणा आहे. तुम्ही लग्नानंतर सासरी गेलाच नाहीत. त्यामुळे सून म्हणून जाणं काय असतं हे तुम्हाला कसं कळणार? आणि सुनेच्या डोळ्यातल्या पाण्याची किंमत तुम्हाला काय कळणार म्हणत त्यांनी हल्लाबोल केला आहे.
इतर महत्वाची बातमी-