पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींच्या विरुद्ध गुंतवणूकादारांनी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील चित्तरंजन वाटिकेमध्ये दर रविवारी भरणाऱ्या ‘आरटीआय कट्ट्या’मध्ये गुंतवणूकदारांना हा निर्णय घेतला आहे.

याचबरोबर डी एस केंच्या मालमत्तांचा लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी राज्य सरकार आणि आरबीआयकडे पाठपुरावा करायचही या गुंतवणूकदारांनी ठरवलं आहे.

पुणे , मुंबई आणि कोल्हापूरमधील हजारो गुंतवणूकदारांचे पैसे थकवलेल्या डी एस कुलकर्णींवर अद्याप कारवाई का होत नसल्याची भावना यावेळी गुंतवणूकदारांनी व्यक्त केली.

दुसरीकडे डीएसके जामिनाची रक्कम भरण्यातही अपयशी ठरले आहेत. त्यावरुन हायकोर्टाने काही दिवसांपूर्वीच डीएसकेंची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. “तुम्हाला कोठडीत पाठवण्यास आम्हाला एक क्षणही पुरेसा आहे. तुम्ही स्वत:ची अवस्था सहाराप्रमाणे करुन घेऊ नका,” अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने डीएसकेंना झापलं आहे.

शिवाय, अटक टाळण्यासाठी 5 फेब्रुवारीपर्यंतची मुदतही हायकोर्टाने दिली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

संबंधित बातम्या

कोठडीत पाठवायला एक क्षण पुरे, हायकोर्टाची डीएसकेंना तंबी

कोणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही : डी एस कुलकर्णी

राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!

बँकांकडून डीएसकेंच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात

डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला

शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट

राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!

शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट