Pune Rikshaw : 14 दिवसांचा अल्टिमेटम देऊन सुद्धा रिक्षाचालकांच्या (rickshaw) विविध मागण्या अजूनही मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे पुण्यातील आरटीओसमोर (pune)  मोठ्याप्रमाणात रिक्षाचालकांनी चक्काजाम केलेला आहे. रॅपिडो बाईक बंद होईपर्यंत चक्काजाम (Strike) असाच सुरु राहणार, अशी भूमिका रिक्षाचालकांनी घेतली आहे. उबेर बाईक, ओला बाईक या आता दुपारी बारा वाजता बंद झालेले आहेत. मात्र अजूनही रॅपिडो बाईक सुरु आहे यामुळेच शेकडो रिक्षाचालक या आंदोलनासाठी उपस्थित झाले आहेत.  रिक्षाचालकांनी बंदची हाक दिल्याने सकाळच्या वेळी पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली होती. प्रवसी, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी खोळंबले होते. पुणेकरांना पर्यायी प्रवासाची सोय शोधावी लागली. 


आश्वासन दिलं पण त्याचं पुढे काय?
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाईक टॅक्सी बंद करण्याबाबत रिक्षाचालकांना आश्वासन दिलं होतं. मात्र 14 दिवस उलटून गेल्यानंतरही शहरात बाईक टॅक्सी सुरुच आहे. त्याच्यावर बंदी घालण्यात आली नाही आहे. त्यामुळे रिक्षाचालक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. घोषणाबाजी करत त्यांनी आरटीओसमोर चक्काजाम केला आहे. 


महत्वाच्या रस्त्यावर रिक्षांच्या रांगाच रांगा
रिक्षाचालकांनी चक्काजाम केल्यानंतर शहरात काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. अनेक पुणेकरांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. संगम चौक ते वाकडेवाडीपर्यंत रिक्षांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. बाईक टॅक्सी कृती समितीतील 16 रिक्षा संघटनांचे रिक्षाचालक आंदोलनात सहभागी झाले आहेत. 


जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आवाहन तरीही रिक्षालाचक रस्त्यावर
काही दिवसांपूर्वीच रिक्षाचालकांना जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आंदोलन न करण्याचं आवाहन रिक्षाचालकांना केलं होतं. मात्र रिक्षाचालक त्यांच्या मागणीसाठी आक्रमक झाल्याचं चित्र आहे. जिल्हा प्रशासनाने रिक्षाचालकांच्या न्याय मागण्यांबाबत नेहमीच सहानुभूतीने विचार केला आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर वाहतूक होऊ नये यासाठी प्रादेशिक परिवहन विभागातर्फे विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. बेकायदेशीर बाईक टॅक्सी ॲप चालवणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई सुरुच असून ॲपवर बंदी घालण्याबाबत राज्याच्या सायबर शाखेकडे पोलीस उपायुक्तांमार्फत पाठपुरवा करण्यात येत आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र रिक्षाचालकांनी मागणी बाबात आक्रमक पावित्रा घेतला आहे.


बाईक टॅक्सी चालकाला मारहाण
काही दिवसांपूर्वी रिक्षाचालकांनी बेमुदत आंदोलन पुकारलं होतं. मात्र चंद्रकांत पाटलांनी स्थगिती दिली होती. त्यावेळी रिक्षाचालकांनी बाईक टॅक्सी चालकाला मारहाण केली होती. हा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. आजच्या चक्काजामनंतर रिक्षाचालक नेमकी कोणती भूमिका घेणार?, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.