पुणे : पुण्यात पाण्याचा प्रश्न वारंवार उफाळून येतोय. आज रेव्हेन्यू कॉलनीतल्या लोकांनी रिकाम्या बादल्या घेऊन थेट महापौरांच्या निवासस्थानावर धडक दिली. आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या दारावरच ठिय्या मांडला होता. येत्या 15 तारखेपर्यंत पुण्याच्या पाणी प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन महापौर मुक्ता टिळक आणि खासदार अनिल शिरोळेंकडून देण्यात आलं आहे. तर पुण्यात अनेक भागात पाणी येत नाहीय. तर उद्यापासून दौंड, इंदापूर, हवेली या अवर्षणग्रस्त भागाला पाणी द्यायचं असल्याने  पुणे शहरात एकच वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे.


पुण्यात आज काय झालं?

पुण्यात आज रेव्हेन्यू कॉलनीतल्या लोकांनी रिकाम्या बादल्या घेऊन थेट महापौरांच्या निवासस्थानावर धडक दिली. आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या दारावरच ठिय्या मांडला. रेव्हेन्यू कॉलनीत मागच्या 15 दिवसांपासून पाण्ण्या प्रश्न गंभीर बनला आहे. रेव्हेन्यू कॉलनी भागात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे लोकांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावं लागतंय.  एकीकडे लोक महापौरांच्या घराबाहेर ठिय्या देत असताना दुसरीकडे महापौरांच्या निवासात खासदार अनिल शिरोळे यांच्या उपस्थितीत पाण्याच्या प्रश्नावर बैठक झाली.

महापौर आणि खासदारांनी आश्वासन दिल्यानंतर देखील लोक विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. लोकांनी लेखी आश्वासन मागितलं होतं. मात्र लेखी आश्वासन मिळालं नाही. येत्या 3 नोव्हेंबरपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत न झाल्यास जंगली महाराज रस्त्यावर रास्ता रोको करु, असा इशारा नागरिकांनी दिलाय.

पाहा बातमीचा व्हिडीओ :