पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत राजकारण्यांच्या नातेवाईकांनी बाजी मारली आहे. पदवीधर गटात मुख्यमंत्र्यांचे चुलत बंधू प्रसेनजीत फडणवीस विजयी झाले, तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार व्यवस्थापन प्रतिनिधीपदी बिनविरोध निवडून आल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा अंतिम निकाल रात्री उशिरा जाहीर झाला. राजकारण्यांचे नातेवाईक पदवीधर गटात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसेनजीत फडणवीस विजयी झाले. तर माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आधीच बिनविरोध निवडून आल्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे दोन चुलत बंधू अनिल विखे- पाटील (पदवीधर गट) आणि राजेंद्र विखे- पाटील (व्यवस्थापन प्रतिनिधी) हे सुद्धा विजयी झाले आहेत. पदवीधर गट :
  1. संतोष ढोरे - खुला गट
  2. अनिल विखे-पाटील - खुला गट
  3. तानाजी वाघ - खुला गट
  4. अभिषेक बोके - खुला गट
  5. प्रसेनजीत फडणवीस - खुला गट
राखीव गट :
  1. दादासाहेब शिनलकर - ओबीसी
  2. बागेश्री मंठाळकर - महिला राखीव
  3. विश्वनाथ पाडवी - ST राखीव
  4. शशिकांत तिकोटे - SC राखीव
  5. विजय सोनावणे - NT राखीव
व्यवस्थापन प्रतिनिधी :
  1. सुनेत्रा पवार - बिनविरोध
  2. सोमनाथ पाटील
  3. श्यामकांत देशमुख
  4. संदीप कदम
  5. राजेंद्र विखे-पाटील