पुणे : पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान एका रेल्वे रुळाचं काम सुरु करण्यात आलं आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी दोन्ही दिशेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
डेक्कन क्वीन आणि भुसावळ एक्सप्रेस या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पुणे-कर्जत आणि कर्जत-पुणे ही ट्रेनही रद्द करण्यात आली. तर पुणे-इंदूर वीस मिनिटं उशिरा लोणावळा स्थानकावर पोहोचली. अनेक ट्रेनचं वेळापत्रक यामुळे कोलमडण्याची शक्यता आहे.
डेक्कन क्वीन आणि भुसावळ एक्स्प्रेस या ट्रेन रद्द झाल्याने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. दरम्यान वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दुरुस्तीचं काम, दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत
नाजिम मुल्ला, एबीपी माझा
Updated at:
14 Sep 2017 05:27 PM (IST)
या दुरुस्तीच्या कामामुळे अनेक गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं आहे. डेक्कन क्वीन आणि भुसावळ एक्सप्रेस या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पुणे-कर्जत आणि कर्जत-पुणे ही ट्रेनही रद्द करण्यात आली.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -