नवी दिल्ली : महाराष्ट्रातलं सर्वात स्वच्छ महाविद्यालय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठानची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीमध्ये या महाविद्यालयाचा समावेश करण्यात आला आहे.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातल्या 174 शिक्षण संस्थांची स्वच्छता मानांकनं जाहीर केली. यामध्ये स्वच्छ कॉलेज, विद्यापीठ, टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि सरकारी संस्थांचा समावेश आहे.
स्वच्छ कॉलेजांच्या यादीत तामिळनाडूतील कोंगू आर्ट आणि सायन्स कॉलेज अव्वल स्थानावर आहे. तर बारामतीचं विद्या प्रतिष्ठान आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज दुसऱ्या क्रमांकाचं स्वच्छ महाविद्यालय ठरलं आहे. तर चेन्नईतील रामकृष्ण मिश विवेकानंद कॉलेचा तिसरा क्रमांक आहे.
आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यातल्या मित्रत्वाच्या कहाण्या परिचित आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींना शरद पवार जवळचे वाटतात, तसंच मनुष्यबळ विकास मंत्रालयाला महाराष्ट्रात फक्त बारामती जवळचं वाटतं की काय असा प्रश्न पडू लागला आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देशातील स्वच्छ महाविद्यालयांमध्ये शरद पवारांचं विद्या प्रतिष्ठान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Sep 2017 03:39 PM (IST)
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातल्या 174 शिक्षण संस्थांची स्वच्छता मानांकनं जाहीर केली. यामध्ये स्वच्छ कॉलेज, विद्यापीठ, टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि सरकारी संस्थांचा समावेश आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -