कर थकवल्याप्रकरणी रिलायन्सचं पुण्यातील कार्यालय सील
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 27 Dec 2016 11:13 PM (IST)
पुणे: 'कर लो दुनिया मुठ्ठी मे' म्हणणाऱ्या रिलायन्स कम्युनिकेशनच्या पुण्यातील कार्यालयाला टाळं ठोकण्यात आलं आहे. मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी पुणे महापालिकेनं ही कारवाई केली आहे. रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीनं 84 कोटींचा कर थकवल्याची माहिती मिळते आहे. वारंवार नोटीस पाठवूनही कंपनीनं कर न भरल्यानं पालिकेनं कारवाईचा बडगा उचलला. रिलायन्स कम्युनिकेशन प्रमाणेच ऍसेंड टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवरही कर थकवल्याप्रकरणी महापालिकेनं कारवाई केली आहे.