Baramati Crime News: सख्ख्या भावाने भावाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना बारामती (baramati crime) तालुक्यात घडली आहे. शेतात भावाने एक लाकडाचे ओंडके आडवे टाकले म्हणून वैतागलेल्या दुसऱ्या भावाने कुऱ्हाडीने वार केले त्यात भावाचा जीव (Murder) गेला. ही घटना बारामती तालुक्यातील मोढवे गावात काल घडली.
तायप्पा मोटे अस मयत व्यक्तीचे नाव आहे. रामा मोटे आणि तायप्पा मोटे हे सख्खे भाऊ आहेत. रामा मोटे यांनी शेतात जाण्याच्या रस्त्यावर लाकडाचा ओंडका टाकला होता. आडवा ओंडका का टाकला, असा प्रश्न तायप्पाने रामा मोटेला प्रश्न विचारला. यावरुन दोघांमध्ये चांगलीच वादावादी झाली. त्यानंतर रामा मोटे याने सख्या भावावर कुऱ्हाडीने हल्ला केला. तायाप्पा यांची सून लक्ष्मी महादेव मोटे यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून रामा मोटे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
शेतात ये-जा करण्याच्या रस्त्यावर ओंडका टाकला होता. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. एकमेकांना धमक्या दिल्या. मारुन टाकीन असंही धमकावलं. वाद टोकाला गेला आणि कुऱ्हाडीने वार करायला सुरुवात केली. पहिला वार तायप्पा यांनी चुकवला मात्र दुसरा वार त्यांच्या पायावर आला. यातच त्यांचा जीव गेला.
कोंढव्यात देखील किरकोळ वादातून घेतला होता जीव
चार दिवसांपुर्वी पुण्यातील कोंढवा येथे एका 23 वर्षीय तरुणाची नागरीकांसमोरच वार करून हत्या करण्यात आली होती. कोंढवा येथील शिवनेरी नगर येथील महेश गुजर असे मृताचे नाव होतं. ही भीषण हत्या घडल्याने परिसरातील दुकानदारांनी शटर बंद करून ते परिसर सोडून पसार झाले होते. पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले होते. पीडित व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तरीही त्यांनी त्याला मदत करण्यास, रुग्णालयात नेण्यास किंवा पोलिसांना कॉल करण्यास अनेकांनी नकार दिला होता. त्याची बहीण सोनी गुजर हिने कोंढवा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी राजेश पवार, कृष्णा मराठे, सचिन राठोड, अमर गव्हाणे, गणेश हाके यांना ताब्यात घेतले होते.