पुणे: पुण्यातील कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसचा हात सोडत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशावर विरोधकांनी कडून टीका केली. त्यावरती रवींद्र धंगेकर यांनी देखील प्रतिउत्तर देत पक्षप्रवेशावर स्पष्टीकरण दिले आहे. तर वक्फ बोर्डाच्या जागेवरती बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, ही बोर्डाची जागा असेल तर, याचा त्रास मुस्लिम समाजाला व्हायला पाहिजे होता. हा त्रास मुस्लिम समाजाला झाला नाही, तर हा त्रास झाला भाजपाचा नेत्यांना का झाला, तर एका हिंदूने वक्फ बोर्डाची जागा घेतली. त्यांना कोणत्या दिशेने राजकारण न्यायचं तेच समजत नाही. वक्फ बोर्डाची जागा असेल तर आम्ही पहिल्याच दिवशी जाहीर केलं होतं, ती आम्ही सोडून देऊ. माझा जो त्यामध्ये हिस्सा आहे, तो मी सोडून देईल असे मी सांगितलं होतं. आपल्याला कोणाचं नको आहे आणि आपण ते घेताना पैसे देऊन घेतला आहे. त्याचे खरेदी झाली. रेरा झालं. त्यावर बँकेने आम्हाला लोन दिल. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आम्ही प्रामाणिकपणे जाहिरात देऊन सगळं केलेला आहे. जोपर्यंत आम्ही जाहिराती दिल्या होत्या आणि सगळं सांगून गेलो होतो. तोपर्यंत हा विषय आला नाही. जेव्हा मी विधानसभेला उभे राहिलो, तेव्हा हा विषय आला. त्यानंतर पुन्हा राज्यसभेला आला, त्यावर पत्र काढण्यात आली. त्यावर मोर्चे झाले. आमच्या राष्ट्रवादीचे नेते त्यांनी पत्र काढले, हे सगळं आता माहिती झालं आहे, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.


वादाची सुरुवात होण्यासाठी, भारतीय जनता पक्षाचे नेते कारणीभूत


पत्नीचे नाव या प्रकरणात येण्यासाठी, वादाची सुरुवात होण्यासाठी, भारतीय जनता पक्षाचे नेते कारणीभूत होते, ही वस्तू स्थिती आहे. आता आम्ही त्यांची किती वेळा नाव घेणार. यामध्ये काल जो तक्रारदार होता, तो भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या मामाचा मुलगा होता. तो मुस्लिम असला तरी देखील भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या तो मामाचा मुलगा होता. तो भाजपासाठी काम करतो. जर हे सगळं चुकीचं असतं, तर कोर्टानेच तो स्टे दिला नसता, त्याचबरोबर वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना कसं प्रेशर झालं, काय झालं, कशा पद्धतीने त्यांना हा निर्णय द्यावा लागला, हे आम्हाला कळत आहे, आम्ही त्या सिस्टममध्ये आहे, असंही धंगेकरांनी पुढे म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं दीडशे कोटीची प्रॉपर्टी आहे, दोनशे कोटींची प्रॉपर्टी आहे. मला पाच दहा कोटी दिले, तरी मी माझी सगळी प्रॉपर्टी द्यायला तयार आहे. माझं कर्ज वगैरे फेडलं तर काही म्हणणं नाही. हे सगळं ठरवून चाललेलं आहे, त्यातून हे सर्व प्रकार घडलेले आहेत, असेही पुढे रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.


माझ्या विरोधात तक्रार देणारा भाजपचा कार्यकर्ता


भारतीय जनता पक्षाला माझा त्रास झाला. वक्फ बोर्डाची आम्ही घेतलेली जागा पुर्णपणे कायदेशीर आहे. माझ्या विरोधात तक्रार देणारा भाजपचा कार्यकर्ता आहे. मी कोणाला घाबरत नाही. पुणे महापालीकेचे आयुक्त राजेंद्र भोसले चुकीचे काम करत आहेत. ठरावीक नगरसेवकांच्या प्रभागात चाळीस चाळीस कोटींचा निधी देण्यात आला आहे. मी आणखी संघर्ष करणार आहे. कोणत्याही पक्षाचा असला तरी चुकीचे काम केले तर त्याला विरोध करणार आहे. भाजपचे स्थानिक नेते मला घाबरतात, म्हणून माझ्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशाला विरोध केला जातो आहे. भाजपमध्ये सगळेच लोक वाईट नाहीत. काहीजण विरोधात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संधी दिली, तर सांगेन की, मी कसा बरोबर आहे आणि त्यांचे स्थानिक नेत्यांनी कशी चुकीची माहिती दिली. माझी बायको खंबीर आहे‌‌. ती मला लढायचे बळ देते. कॉंग्रेसचे आभार, कॉंग्रेसमुळेच मी आमदार बनलो. अरविंद शिंदेंवर मी बोलणार नाही असंही पुढे ते म्हणाले आहेत.