पुणे : पुण्यातील येरवडा भागात एका भोंदूबाबावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा येरवडा पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे.
पुण्यातील एका 30 वर्षीय महिलेला करणी झाल्याने पतीशी नातं तुटलं असल्याच सागंत भोंदूबाबाने वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याची घटना समोर आली आहे. भोंदूबाबाचं नाव रफिक शाह असून गेल्या वर्षभर महिलेवर लैंगिक अत्याचार करत होता. पण अत्याचार असह्य झाल्याने महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे.
दरम्यान भोंदूबाबा पाणी, अंगारा आणि ताईत देऊन करणी उठवतो असा बनावही रचत होता. पीडित महिलेला त्याने पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलेने तक्रार दिल्यानंतर भोंदूबाबाला येरवडा पोलिसांनी गजाआड केलं आहे.