Pune: कैद्यांच्या नावाखाली करण्यात आलेला घोटाळा म्हणजे मेलेल्या मढ्यावरचा टाळूवरील लोणी खाण्यातल्या प्रकार कारागृह विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे. या घोटाळ्यात तत्कालीन कारागृह पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता व विशेष पोलिस महानिरिक्षक जालिंदर सुपेकर या दोघांच्या मास्टरमाईंडने हा कारभार घडला असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

Continues below advertisement

2022- 23 ते 2025-26 या वर्षात कारागृहात रेशन , कॅन्टीन तसेच इतर उपकरणे खरेदीमध्ये करण्यात आलेल्या घोटाळ्याची आकडेवारी जवळपास 500 कोटी रुपयांपर्यंत असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली आहे. राज्याच्या कारागृह विभागात यासारखे अनेक भ्रष्टाचाराचे प्रकार घडले असून राज्य सरकारने याबाबत स्वतंत्र चौकशी समिती नेमून याची सखोल चौकशी करावी अशी मागणी शेट्टी यांनी केलीय. 

दर निश्चितीला वाढीव दर लावले

राज्यातील कारागृहातील कैद्यांना कारागृहात एक वेळचा चहा व दोन वेळचे जेवण वगळता बेकरी पदार्थ , फळे , भाजीपाला यासह दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या 627 प्रकारच्या साहित्याचे खरेदी दर जालिंदर सुपेकर यांनी निश्चीत केले असल्याचं सुद्धा शेट्टी म्हणतात

Continues below advertisement

दर निश्चीत करत असताना बाजारातील सर्वाधिक महागड्या वस्तू व वाढीव बाजारातील दर पकडण्यात आले आहेत. 

द्राक्षे: 215 रूपये किलो 

टोमॅटो: 75 रूपये किलो

कांदा: 88 रूपये किलो

बटाटा: 87 रूपये किलो   

गूळ: 9o रूपये किलो

साखर: 53 रूपये किलो 

चिकन: 300 रूपये किलो

केळी:70 रूपये डझन 

कारागृहातला अनागोंदी कारभार समोर 

राज्यातील कारागृहात कैद्याच्या पालनपोषणासाठी राज्य सरकार वर्षाकाठी शेकडो कोटी रुपये खर्च करत असते. रेशन व कॅंन्टीनमधून कारागृहातील कैद्यासाठी दैनंदिन लागणारे गहू, तांदूळ , साखर ,डाळी , दुध , फळे ,भाजीपाला ,कांदा , बटाटा, चिकन -मटण , अंडी , बेकरी पदार्थ यासारखे दैनंदिन पदार्थ खरेदी करण्यात येतात.

गत दिवाळीत राज्यामध्ये जवळपास 5 कोटी रूपयाची खरेदी करण्यात आली आहे. ही खरेदी करण्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया करण्यात आली नाही. सोबत फराळाचे साहित्य व त्याचे दरपत्रक टाकले आहे यावरून कारागृहात किती अनागोंदी कारभार चाललेला आहे हे लक्षात येईल.', असे आरोप राजू शेट्टी यांनी केले होते.