पुणे: वैष्णवी हागवणेच्या मृत्यूनंतर तिचे सासरे राजेंद्र आणि सुशील हगवणे फरार झाले होते. त्या दोघांचा शोध घेण्यासाठी बावधन पोलीस 17 मे ला पवना धरण परिसरातील बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसला गेले होते. त्यावेळी त्यांना हगवणे बाप लेक सापडले नाहीत. आम्ही त्यांचा शोध घेण्यासाठी बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसला गेलो होतो, हा सांगण्यासाठी पोलीसांकडूनच हे फोटो देण्यात आलेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे हेच बावधन पोलीस 18 मे ला पुन्हा याच फार्म हाऊसला गेले होते असं पोलीसांचाच रेकॉर्ड सांगतो आहे. मग त्यावेळी पोलीसांना ते का सापडले नाहीत असा प्रश्न निर्माण होतो आहे.
कस्पटे परिवाराने दिली होती हगवणेंची माहिती
राजेंद्र हगवणे पवना धरणावरील बंडू फाटकच्या फार्म हाऊसवर होता, याची माहिती पोलिसांना दिली होती. परंतु हगवणे तिथं नव्हते असं पोलिसांना कळवलं, अटकेनंतर मात्र हगवणे त्यांच्या फार्म हाऊसवर होते. हे समोर आलं आहे. एपीबी माझाशी बोलताना वैष्णवीचे काका मोहन कस्पटे म्हणाले की, आम्ही बंडू फाटकांच्या फार्म हाऊस राजेंद्र हगवणे आहे असं पोलिसांना कळलं होतं, तेव्हा त्यांनी तिथे ते नाही असं सांगितलं आणि आता तपासात दिसत आहे की, ते तिथं होते. बंडू फाटकच्या इथे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे असल्याची माहिती आम्ही पोलिसांना दिली होती. आम्ही लोकेशन सांगितलं होतं. साहेबांनी चौकशी केली तर तेव्हा ते म्हणाले होते तिथे ते नाहीत. आता तपासांती समजत आहे की त्या तिथेच होते. आमची बातमी देखील शंभर टक्के खरी होती याची पुष्टी आम्हाला मिळत आहे. या निलेश चव्हाणचा देखील लवकरात लवकर तपास व्हावा अशी आमची मागणी आहे.
पोलिसांचे फोटो समोर
राजेंद्र आणि सुशील हगवणे फरार असताना त्या दोघांचा शोध घेण्यासाठी बावधन पोलीस 17 मे ला पवना धरण परिसरातील बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसला गेले होते. त्यावेळी त्यांना हगवणे बाप लेक सापडले नाहीत. आम्ही त्यांचा शोध घेण्यासाठी बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसला गेलो होतो, हा सांगण्यासाठी पोलीसांकडूनच हे फोटो देण्यात आलेत. पोलिसांच्या या फोटोमुळे पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत. पोलिसांच्या तपासाबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन वेळा पोलिस त्यांना पकडण्यासाठी गेले मात्र, दोन्ही वेळी रिकाम्या हाती परतले.
हगवणे बाप लेक 18 मे पासून ज्या बलेनो गाडीतून फरार झाले ती बलेनो गाडी आशिष शिंदे यांच्या मालकीची आहे. आशिष शिंदे हा राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचा मुळशी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचा तालुकाध्यक्ष आहे. 17 तारखेला त्यांनी आधी एंडेव्हर आणि नंतर थार गाडी वापरली होती. एंडेव्हर सुशील हगवणेच्या तर थार संकेत चोंधेच्या नावावर आहे.
सात दिवसांत राजेंद्र हगवणे पोलिसांच्या मात्र हाती लागत नव्हता
पोलिसांच्या रेकॉर्डनुसार तो 17 मे रोजी औंध हॉस्पिटल मुहूर्त लॉन्सला थार गाडीनं गेला...त्यानंतर वडगाव मावळ पवना डॅमवरच्या फार्म हाऊसमध्ये आणि शेवटी आळंदीतल्या लॉजवर मुक्कामाला गेला.
18 मे रोजीवडगाव मावळ आणिपवना डॅम इथं बंडू फाटक नावाच्या व्यक्तीकडे बलेनो गाडीनं पोहोचला
19 मे रोजीसातारा जिल्ह्यातल्या पुसेगावमध्ये अमोल जाधव यांच्या शेतावर गेला
19 मे आणि 20 मे रोजीपसरणीमार्गे बेळगाव जिल्ह्यातल्या कोगनोळीत जाऊन हॉटेल हेरीटेजमध्ये पोहोचला...
21 मे रोजीकोगनोळीत प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावर तो मुक्कामाला होता
22 मे रोजीराजेंद्र हगवणे पुण्याला परत आला. सात दिवसांत इतका प्नवास करणारा राजेंद्र हगवणे पोलिसांच्या मात्र हाती लागत नव्हता..
हगवणे माझ्या फार्म हाऊसवर आलेले पण
सून वैष्णवीचा हुंडाबळी घेतल्यावर फरार झालेला राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील वडगाव मावळमध्ये गेले होते. तिथं शिरोली-चांदोली गावचे सरपंच बंडू फाटकांच्या फार्म हाऊसवर दुपारची विश्रांती घेतली, हे तेचं फार्म हाऊस आहे, जे पवना धरण परिसरात आहे. यामुळं अडचणीत आलेल्या बंडू फाटक यांनी मात्र मला हगवणेंनी केलेल्या कृत्याची कल्पना नव्हती. मी मुलाच्या लग्न सोहळ्यात व्यस्त होतो, त्यावेळी मला माझे मित्र बंडोपंत भेगडेंचा फोन आला, त्यांनी माझं हगवणेंशी बोलणं करुन दिलं. त्यावेळी हगवणेंनी मी तुमच्या फार्म हाऊसवर थांबतोय असं कळवलं. त्यामुळं मी राहू दिलं. पोलिसांना मी याची कल्पना दिली असून यापुढं ही चौकशीला बोलवलं तर मी नक्की सहकार्य करेन, असं बंडू फाटक म्हणालेत.