मुंबई : सर्वांचा लाडका गणपती बाप्पा दहा दिवसांच्या मुक्कामानंतर आज निरोप घेणार आहे. गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक सज्ज झाले असताना सकाळपासूनच मुंबईत पाऊस पडत आहे.


मुंबई पुण्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे विसर्जन मिरवणुकांवर पावसाचं सावट निर्माण झालं आहे. भाविकांचा काहीसा हिरमोड झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बाप्पाला निरोप देताना वरुणराजाला अश्रू अनावर झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.


सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसोबतच पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाची रिमझिम सुरु आहे. तर पुण्यातही पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.