पिंपरीमध्ये अंगावर गाडी घातल्याने पोलिसाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 15 Sep 2016 07:50 AM (IST)
पुणे : पिंपरी परीसरात दुचाकी अंगावर घातल्याने भोसरी एमआयडीसीचे एएसआय सुरेश चपटे यांचा मृत्यू झाला आहे. दुचाकीस्वारांना पकडण्याचा प्रयत्न करताना अज्ञातांकडून त्यांच्या अंगावर दुचाकी घालण्यात आली होती. पिंपरी परीसरात रविवारी संध्याकाळी तिघे जण दुचाकीवरुन जात असताना एएसआय सुरेश चपटेंनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण दुचाकीस्वारांनी पळून जात एएसआय सुरेश चपटे यांच्या अंगावर गाडी घातली. या घटनेत त्यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला होता. तसंच त्यांच्या डोक्याला आणि नाकालाही मार लागला होता. जखमी एएसआय यांच्यावर उपचार सुरु होते, पण झालेल्या अपघातातून न सावरलेल्या सुरेश चपटे यांना रात्री दोनदा झटके आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ज्या तिघांनी त्यांच्या अंगावर गाडी घातली होती ते फरार झाले आहेत. पोलिसांवरील हल्ल्यांमध्ये गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांना गाडी अडवल्यामुळे मारहाण झाली होती. यात त्यांचा मृत्यू झाला होता. संबंधित बातम्या :