Pune Bypoll election : चिंचवडचे (Chinchwad Bypoll Election) राहुल कलाटे (Rahul kalate) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही आहे. त्यामुळे आता चिंचवडमध्ये (pune bypoll election) तिरंगी लढत होणार आहे. राहुल कलाटेंनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांनी प्रयत्न केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी देखील फोनवरुन संपर्क साधला होता. मात्र ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. चिंचवडमध्ये माझा विजय पक्का आहे, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 


वरिष्ठ नेत्यांकडून मनधरणीचे प्रयत्न तरीही राहुल कलाटे यांची माघार नाहीच


महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल कलाटेंच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीच बिघाडी झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी राहुल कलाटेंची भेट घेतली आणि त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केली. त्यात विरोधीपक्ष नेते अजित पवार, आमदार सुनील शेळके, शिवसेना संपर्क प्रमुख सचिन अहिर आणि त्यानंतर थेट शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांना फोन करुन उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केली होती. महाविकास आघाडीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. 


बंडखोरीचं कारण काय?


2019 मध्ये राहुल कलाटे हे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात अपक्ष लढले होते. त्यावेळी त्यांना लाखांमध्ये मतं मिळाले होते. यात काही हजारांच्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता. सध्या राष्ट्रवादीकडून उमेदवार असलेल्या नाना काटेंनादेखील राहुल कलाटेंपेक्षा कमी मतं मिळाले होते. त्यामुळे राहुल कलाटेंना नागरिकांचं मोठं समर्थन असल्याचं समोर आलं आहे. यावेळीदेखील यात समर्थकांच्या जोरावर त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. 


ते म्हणाले, मला निवंती केलेल्या सगळ्या नेत्यांचा मी आदर करतो मात्र मला साथ देणाऱ्या सगळ्यांनी मला लढ म्हणून सांगितलं. मागच्यावेळी मला 1 लाखपेक्षा जास्त लोकांनी मला मतदान केलं होतं. त्यामुळे सगळ्यांच्या आदरासोबतच मला चिंचवडच्या जनतेचाही आदर करायचा आहे. जनतेच्या पाठिंब्यामुळे मी या निवडणूकीला सामोरं जात आहे. ही निवडणूक तिरंगी झाली तर त्याचा मला फायदाच होईल असं ते म्हणाले.


चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत


चिंचवडमध्ये आता दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, महाविकास आघाडीकडून नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. या तिघांमध्ये नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तिहेरी लढत होणार असल्याने ही निवडणूक रंजक असणार आहे.