पिंपरी चिंचवड : उच्चशिक्षितांपासून शेत मजूर महिला असो किंवा क्रीडापटू, पिंपरी चिंचवडला विविध क्षेत्रातील महापौर लाभलेत. यावेळी पहिल्यांदाच रिक्षाचालक व्यक्ती महापौरांच्या खुर्चीवर विराजमान झाली आहे.
रिक्षाचालक ते महापौर असा खडतर प्रवास राहुल जाधव यांनी केला आहे. भाजपच्या इतिहासातील पिंपरी चिंचवडचा दुसरा महापौर होण्याचा मान राहुल जाधव यांना मिळाला.
1997 ते 2002 अशी पाच वर्ष त्यांनी रिक्षा चालवली. त्यानंतर दोन वर्ष शेती केली. 2004 साली विवाहबंधनात अडकल्यावर राहुल जाधव एका कंपनीत चालक म्हणून नोकरी. असा खडतर प्रवास सुरु असतानाच राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली आणि तिथूनच राहुल जाधव यांची राजकारणात एन्ट्री झाली.
2012 साली राहुल पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यानंतर भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगेंसह ते 2017 साली भाजपमध्ये दाखल झाले.
मुलगा महापौर होईल असा कधी स्वप्नातही विचार न केलेले आई-वडील भारावून गेले आहेत. मुलाने आता फक्त जनतेची सेवा करावी अशी अपेक्षा ते व्यक्त करतात.
रिक्षाचालकांपैकी एक महापौर झाल्याने, शहरातील रिक्षाचालकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पण याचवेळी त्यांच्या रिक्षावाले महापौरांकडून त्यांना अनेक अपेक्षा आहेत.
चहा विकणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि चाय पे चर्चा ही रंगू लागल्या. आता महापौर राहुल जाधव यांच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडमधील रिक्षा चालकांना अच्छे दिन येतील आणि या रिक्षाचालकांमध्ये चांगले बदलही दिसतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.
पिंपरी चिंचवड महापौर निवडणूक
एकूण मते - 128
एकूण मतदान - 113
राहुल जाधव (भाजप) - 80
विनोद नढे (राष्ट्रवादी) - 33
तटस्थ - 7
रिक्षा चालक व्यक्ती पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी विराजमान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Aug 2018 12:17 PM (IST)
यावेळी पहिल्यांदाच रिक्षाचालक व्यक्ती महापौरांच्या खुर्चीवर विराजमान झाली आहे. भाजपच्या इतिहासातील पिंपरी चिंचवडचा दुसरा महापौर होण्याचा मान राहुल जाधव यांना मिळाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -