Pune Chandani Chowk Bridge Demolition :  पुण्याच्या (Pune) चांदणी चौकातील  (Chandani Chowk) पुल पाडण्याची तयारी सुरु झाली आहे. त्यासाठी पुलाच्या भिंतींमधे स्फोटकं भरावी लागणार आहेत. त्यासाठी पुलाच्या भिंतींना ड्रीलींग करुन होल्स पाडण्याचं काम सुरु झालं आहे. स्फोटानंतर अवघ्या आठ दे दहा सेकंदांमधे हा पुल जमिनदोस्त होणार आहे. पण त्यानंतर जो राडारोडा तयार होणार आहे तो हटवण्यासाठी आठ ते दहा तास लागणार आहेत. या कालावधीत मुंबईहून - पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी रस्ता द्यावा लागणार आहे. नवीन उड्डाणपूलाची पाषाण- बावधन कडे लेन तयार झालेली असली तरी जुना पुल पाडण्यासाठी मुंबईहून- पुण्याकडे येणाऱ्या महामार्गास एन एच ए आय ला पर्याय उपलब्ध करून द्यावा लागणार आहे आणि त्याला वेळ लागण्याची शक्यता आहे. 


चांदणी चौकात वाहतूक वळवली
-नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी (NDA) आणि मुळशीकडून पाषाण, बावधन, कोथरूड आणि वारजेकडे जाणारी वाहतूक नव्याने बांधण्यात आलेल्या फ्लायओव्हर क्रमांक 1 वरून सोडण्यात येणार आहे.


-एनडीए, मुळशी येथून मुंबईकडे जाणारी वाहतूक फ्लायवे क्रमांक 7 वरून फ्लायओव्हर क्रमांक 3 मार्गे सोडण्यात येईल. इतर रस्त्यांवरील वाहतूक पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.


-मुंबईहून कोथरूडकडे जाणारी वाहतूक सध्याच्या कोथरूड मार्गाने वळवण्यात येणार आहे.
-कोथरूड ते मुंबई वाहतूक कोथरूड भुयारी मार्गाने वेद विहारकडे जाईल.


-कोथरूडकडून सातारा, वारजेकडे जाणारी वाहतूक वेदविहार सर्व्हिस रोडवरील शृंगेरी मठाजवळ महामार्गावरून वळवण्यात येणार आहे.


दिलेली वाहतूक वळवण्याची योजना या आठवड्यात तात्पुरत्या कालावधीसाठी आहे. जेव्हा चांदणी चौकातील जुना पूल पाडला जाईल. नंतर जुना पूल पाडल्यावर त्यावेळचे नवे मार्ग आणि वळण सार्वजनिक वापरासाठी प्रकाशित केले जातील, अशी माहिती NHAI पुणे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली आहे. 


ट्विन टॉवर पाडणारी कंपनीच पाडणार चांंदणी चौकातील पूल
पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यासाठी Edifice engineering या कंपनीची NHAI ने निवड केलीय. ही तीच कंपनी आहे ज्या कंपनीकडून काही दिवसांपूर्वी दिल्लीतील ट्वीन टॉवर्स पाडण्यात आले होते. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल  (Bridge Demolish)  पाडण्यात येणार आहे. हा पूल 10 सेकंदात पाडण्यात येणार आहे. पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक (Traffic) कोंडी फोडण्यासाठी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. त्यामुळे जुना पूल पाडण्यात येणार आहे. त्यासाठी edifice engineering या कंपनीचे कर्मचारी उद्या सर्वेक्षण करण्यासाठी या पुलाची पाहणी केली आहे. विशेष म्हणजे हे पाडकाम कंट्रोल्ड एक्स्ल्पोजन सिस्टिमद्वारे होणार आहे.