Pune Crime News: थेऊर परिसरातील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या आवारात सापडलेल्या तरुणीच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पुणे शहर पोलिसांना यश आले आहे.लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या तपासात तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचे उघड झाले. वैशाली लाडप्पा दुधवाले असे मृत महिलेचे नाव असून ती मूळची उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. सध्या ती भीमा कोरेगाव येथे राहत होती. तिचा प्रियकर महेश पंडित चौघुले याला पोलिसांनी अटक केली असून तोही मूळचा उस्मानाबादचा आहे.
वैशाली केअर टेकर म्हणून काम करत होती. दोघेही एकाच गावातील आहेत. पाच महिन्यांपूर्वी ते प्रेमात पडले. सध्या पुण्याजवळील तळेगाव दाभाडे या गावात राहतो. चौघुले हे तळेगाव दाभाडे येथील एका हॉटेलमध्ये कामाला होते. चारित्र्याच्या संशयातून वैशालीची हत्या केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
5 जुलै रोजी तिची हत्या झाल्याचे समोर आलं होतं. त्यावेळी तरुणीची ओळख पटली नाही. मृतदेह सापडून 24 तास झाल्यानंतरही कोणाची तक्रार आली नव्हती. वैशालीचे कुटुंबीयांचाही पत्ता लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी नागरिकांची मदत मागितली होती. त्याप्रकराचं आवाहन नागरिकांना केले होते अखेर त्या मुलीची ओळख पडली, त्यानंतर सगळ्या प्रकारच्या तपासणीनंतर मुलीची ओळख उघड झाली. त्यानंतर पोलिसांनी वैशालीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. तिच्या आईचीसुद्धा चौकशी करण्यात आली. त्यानंतर वैशालीचे आरोपी चौगुलेसोबत प्रेमसंबंध असल्याचे उघड झालं. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली.
चौकशीत त्याने वैशालीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचं उघड झालं. चारित्र्याच्या संशयातून वैशालीची हत्या केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली. डीसीपी नम्रता पाटील आणि एसीपी बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. या पथकात पीएसआय अमित गोरे व त्यांच्या पथकातील सदस्य राजेश दराडे, गणेश भापकर, निखिल पवार, मल्हारी धमढेरे यांचा समावेश होता.
Pune Crime News: लोणी काळभोरमध्ये आढळला अज्ञात तरुणीचा मृतदेह; ओळख पटण्यासाठी पोलिसांचं आवाहन