पुण्यात महिलेची गोळी झाडून हत्या, पती ताब्यात
एबीपी माझा वेब टीम | 21 Nov 2018 02:01 PM (IST)
दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचं स्पष्ट झालं आहे. ही घटना घडली तेव्हा त्यांचे पती ब्रिजेश घरातच होते.
पुणे : पुण्यात महिलेची राहत्या घराजवळ गोळी झाडून हत्या झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पती ब्रिजेश भाटी यांनीच अनुजा भाटी यांची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुण्यातील चंदननगरच्या आनंद पार्क परिसरात इंद्रामनी सोसायटीमध्ये अनुजा यांची हत्या करण्यात आली. दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचं स्पष्ट झालं आहे. ही घटना घडली तेव्हा त्यांचे पती ब्रिजेश घरातच होते. अनुजा भाटी यांचा वडगाव शेरी परिसरात केटरिंगचा व्यवसाय होता. अनेक सॉफ्टवेअर कंपनीमध्ये त्या डबे पोहोचवत होत्या. मूळचं नोएडाच असलेलं भाटी कुटुंब दोन वर्षांपासून पुण्यात व्यवसायासाठी राहत आहे. चंदननगर पोलिस अधिक तपास करत आहेत.