Pune Weather Update : जानेवारीच्या उत्तरार्धात पुणे शहराच्या तापमान कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे दिवसाही हवेत गारवा जावणत असल्यामुळे सर्वत्र हुडहुडी पसरली आहे.  मागील तीन दिवसांपासून पुण्यातील पारा घसरला आहे. पुण्यात गारवा प्रचंड वाढला असून पुणेकर (pune News) महाबळेश्वरसाखं वातावऱण अनुभवत आहेत. शिरुरच्या तापमानात 7.4 अंश सेल्सिअस इतकी घट झाली आहे. तर हवेलीचं पारा 7.8 अंश सेल्सिअसवर घसरला आहे. शिवाजी नगर 8.6 अंश सेल्सेअस तापमान आहे.


पुण्यातील अनेक ठिकाणाचं तापमान (Weather Update) 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरलेय. त्यामुळे कपाटात ठेवलेले स्वेटर लोकांनी पुन्हा एकदा बाहेर काढले. शेकोट्या पेटवल्या जात आहेत. पुढील दोन दिवस थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. पुण्यातील ग्रामीण भागासोबत शहरीभागतही शेकोट्याचा सहारा घेतला जात आहे. पुण्यातील तापमानात मोठी घसरण झाली आहे. यंदाच्या वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. 


पुण्यात महाबळेश्वरचा फिल - 


पुण्यामध्ये यंदाच्या वर्षातील निचांकी तांपनाची नोंद झाली आहे. पुण्याचं तापमान 8.6 अंश सेल्सियसवर घसरले आहे. बारामतीचं तापमान 8.7 अंश सेल्सिअस इतकं घसरले आहे. गेल्या दोन दिवसांत पुणे शहराच्या तापमान सातत्याने घट होत आहे. पुण्यातील अनेक ठिकाणावरील तापमान  10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. ग्रामीण भागासह शहरीभागातही शेकोट्या पेटवल्या जात आहेत. 


पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आज किती तापमान ?


वडगावशेरी 17 
लव्हाळे  17 
लोणावळा 16.2
मगरपट्टा 15.5
खेड 14.7
कोरेगावपार्क 14.4
बालेवाडी 13.4
चिंचवड 14.9
आंबेगाव 10.0
गिरीवन 13.1
दापोडी 13.0
बालेवाडी 12.9
नारायणगाव 10.0
हडपसर 12.2
शिरुर 12.8
डुडुळगाव 12.1
भोर 12.2
तळेगाव 10.4
ढमढेरे 10.3
पुरंदर 10.9
दौंड 9.2
लवासा 11.0
इंदापूर 11.1
पाषाण 9.5
निमगिरी 10.2
बारामती 8.7
राजगुरुनगर 9.4
शिवाजी नगर 8.6
हवेली 7.8
एनडीए 7.6
माळीण 7.4


नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे पुण्यातील किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली होती. शहराचे किमान तापमान 18 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यामुळे थंडी गायब झाली होती. मात्र मागील आठव्यापासून तापमानात हळूहळू घट झाली. सध्याच्या घडीला पुण्यातील तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली आलेय. शिरुर, बारामती, एनडीए, पाषाण आणि हवेली भागातील तापमान 9 च्या खाली घसरले आहे. 


नाशिकमध्ये हुडहुडी -  


जानेवारीच्या उत्तरार्धात नाशिक शहरात तापमान कमालीचे घसरले असून दिवसाही कमालीचा गारवा असल्याने सर्वत्र हुडहुडी पसरली आहे. नाशिकमध्ये मागील तीन दिवसांपासून पारा घसरला आहे. निफाडमध्ये 4.4 या नीच्चांकी तापमानाची नोंद तर नाशिकचा पारा 8.6 अंशावर घसरलाय. 


निफाडमध्ये मंगळवारी 6.6 , बुधवारी 5.6 आणि आज 4.4 तपमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये मंगळवारी 10.1, बुधवारी 9.0 तर आज 8.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 


आणखी वाचा :


पुण्यात महाबळेश्वरचा फिल, नाशिकमध्ये मनालीसारखं वातावरण, राज्य गाराठलं!