पुणे :  अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने पुणे जिल्ह्यात गेल्या (Food and Drug Administration)  दोन दिवसात दोन ठिकाणी छापे टाकून 35 लाख 16 हजार 921 रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारीचा साठा जप्त करण्यात आला. पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.


देहू रोड परिसरातील दांगट पाटील यांचे गोदाम, विकासनगर किवळे या ठिकाणी प्रतिबंधित पदार्थाची साठवणूक व विक्री करण्यात येत असल्याच्या माहितीवरुन मंगळवारी 23 जानेवारीला टाकलेल्या छाप्यानुसार 23 लाख 68 हजार 580 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच रियाझ अजीज शेख, घर क्र. 125 , देहू मुख्य बाजार, देहू कॅन्टोन्मेंट, देहू बाजार येथे आज टाकलेल्या छाप्यात 11 लाख 48 हजार 341 रुपये किंमतीचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या दोन्ही प्रकरणात देहूरोड पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला आहे.


अन्न आणि औषध विभागाची करडी नजर


चार दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाने पुणे शहरात  धडाकेबाज कारवाई केली होती. टोनी दा ढाबा येथील धडक मोहीमेत वाहनाचा पाठलाग करून 47 लाख 22 हजार 300 रुपयांचा प्रतिबंधित साठा आणि एक वाहन जप्त करण्यात आला होता . सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवायांचा धडाका लावला आहे. प्रतिबंधित पदार्थांचा अवैध साठा करणाऱ्यावर अन्न आणि औषध विभागाची करडी नजर आहे. या मोहमेअंतर्गत 1 वाहन जप्त करण्यात आलं होतं चतुःशृंगी पोलिस स्टेशनमध्ये वाहनचालकासह तिघांवर एफआयआर दाखल करण्यात आला होता. जनहित आणि जनआरोग्याच्या दृष्टिकोनातुन राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखु, सुगंधित सुपारी इत्यादी तंबाखु जन्य पदर्थावर उत्पादक साठा,  वितरण,  वाहतुक तसेच विक्री यावर 1 वर्षाकरीता बंदी घातलेली आहे. तरीही पुण्यात अनेक ठिकाणी वाहतूक आणि विक्री सुरु असल्याचं दिसत आहे. या संदर्भात माहिती मिळताच थेट कारवाई करण्यात येत आहे. 


तक्रार कशी कराल?


नागरिकांचे जनहित आणि जनआरोग्याच्या दृष्टिकोनातून 18 जुलै 2023च्या आदेशानुसार राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाकु, सुगंधित सुपारी इत्यादी तंबाखु जन्य पदार्थावर उत्पादक, साठा, वितरण व विक्री यावर 1 वर्षाकरिता बंदी घातलेली आहे. प्रतिबंधीत गुटखा, पान मसाला इत्यादीच्या विक्रीबाबतची माहिती असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधण्याचे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) अ. गो. भुजबळ यांनी केले आहे.


इतर महत्वाची बातमी-


Pune Crime News :  लाडू वाटण्यावरुन हडपसरमध्ये दोन टोळ्यात राडा; एकमेकांवर दगडफेक करुन गाड्यांची तोडफोड, 25 ते 26 जणांवर गुन्हा दाखल