पुणे : पुण्यात संध्या ऊन अन् पावसाचा (Pune Weather Update) खेळ सुरु आहे. दिवसभर ऊन तर संध्याकाळच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह पाऊस बरसत आहे. एकीकडे ऊन्हापासून पुणेकरांना दिलासा मिळत असला तरी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होताना दिसत आहे. पुढील चार दिवस विजांच्या पावसाचा अंदाड हवामान खात्याने वर्तवला आहे. काल दिवभर भारतीय हवामान खात्याने विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता त्यानंतर काल मतदान संपल्यानंतर लगेचच शहरात हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, शिवाजीनगरमध्ये रात्री साडेआठवाजेपर्यंत 2.9 मिमी पावसाची नोंद झाली.
दिवसाची थंड सुरुवात झाल्यानंतर दुपारपर्यंत शहरात उष्ण आणि दमट वातावरण जाणवू लागले. मतदानासाठी आलेल्या अनेकांना उष्ण हवामानाचा त्रास सहन करावा लागला. काहींनी तर मतदान केंद्रांवर अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी केल्या. मात्र, साडेपाचनंतर पुणे जिल्हा व परिसरात ढग तयार होऊ लागल्याने वातावरणात बदल झाला. पुण्यात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस झाला आहे. मात्र, पुणे शहरातील मतदानावर याचा फारसा परिणाम झालेला नाही. गेल्या चार दिवसांपासून पुणे शहरात पाऊस पडत असून, 11आणि 12 मे रोजी शहरात शिवाजीनगर 28 आणि 40.4 मिमी येथे मुसळधार पाऊस झाला.
कोणत्या भागात किती पाऊस?
बारामती १०.५ मिमी
गिरिवन १०.५ मिमी
निमगिरी ९.५ मिमी
लावळे ७.५ मिमी
बल्लाळवाडी ५ मिमी
दौंड ५ मिमी
हडपसर ४.५ मिमी
हवेली ४.५ मिमी
एनडीए ३.५ मिमी
कोरेगाव पार्क ३ मिमी
शिवाजीनगर २.९ मिमी
वडगावशेरी २.५ मिमी
ढमढेरे २.५ मिमी
लोहगाव २.२ मिमी
मगरापट्टा २ मिमी
पुरंदर २ मिमी
माळीण १.५ मिमी
पाषाण १.४ मिमी
खेड १ मिमी
राजगुरुनगर ०.५ मिमी
पुढील चार दिवस वातावरण कसं असेल?
१४ मे २०२४: आकाश मुख्यतः निरभ राहून दुपारी, संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
15 मे २०२४: आकाश मुख्यतः निरभ राहून दुपारी, संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
16 मे २०२४:आकाश मुख्यतः निरभ राहून दुपारी , संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
17 मे २०२४:आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी , संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
8 मे २०२४: आकाश मुख्यतः निरभ राहून दुपारी, संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी / संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाची बातमी-