Pune Weather : वातावरणात (Weather) सातत्यानं बदल होतं आहे. कुठं थंडीचा (Cold) कडाका जाणवत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण होत आहे. दरम्यान, राज्याच्या बहुतांश भागात थंडीचा कडाका वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुणे-मुंबई लोहमार्गावरही रेल्वे वाहतूक आज धीमी झाल्याचं चित्रं दिसून आलं. आज पहाटेपासून मावळ तालुक्यावर धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळं द्रुतगती मार्ग असेल किंवा मुंबई पुणे लोहमार्ग दोन्हीही मार्गवरील वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.
मावळ तालुक्यात प्रथमच दाट धुकं पडलं असून अगदी पाच फुटांचे अंतरही लवकर दिसून येत नाही. त्यामुळं या धुक्यातून वाट काढताना झुकझुक गाडीला ही सावधानता बाळगावी लागत आहे. रेल्वे इंजिनचे दिवे चालू करुनच लोणावळा पुणे दरम्यानचा प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर दाठ धुके पडल्यानं धुम्या गतीनं वाहतूक सुरु आहे.
मावळ थंडीने गारठला
पुणे जिल्ह्यात जोराची थंडी पाहायला मिळत आहे. मावळचा भाग थंडीने गारठला आहे. लोणावळ्यात पुणे मुंबई एक्स्प्रेस वे धुक्यात हरवला आहे. तर संपूर्ण मावळ तालुक्यात धुक्याची चादर पसरली आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत घाट माथ्यावरील पट्टा धुक्यात हरवल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. थंडगार वारे आणि आल्हाददायक धुकं यामुळं पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवरील लोणावळ्याचा निसर्ग मनमोहक झाला आहे. तर दुसरीकडे वाहनचालक गाडी चालवताना या आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटत आहे.
24 डिसेंबरपर्यंत राज्यात थंडीचा जोर असणार
ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 डिसेंबरपर्यंत राज्यात थंडीचा जोर असणार आहे. त्यानंतरच्या पुढील पाच दिवस म्हणजे 25 ते 29 डिसेंबर दरम्यान, तापमानात अजुन वाढ होवून ऊबदारपणा जाणवेल, अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. मात्र, महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसल्याचे खुळे म्हणाले. माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह कोकणमध्ये किमान तापमान 15 ते 20 तर कमाल 31 ते 34 डिग्री से राहणार आहे. खान्देश सह मध्यमहाराष्ट्र -किमान तापमान हे 7 ते 14 तर कमाल तापमान 26 ते 31 डिग्री से. ग्रेड . मराठवाडा - किमान तापमान हे 9 ते 11 तर कमाल तापमान 29 ते 30 डिग्री से. ग्रेड विदर्भ -किमान तापमान हे 9 ते 13 तर कमाल तापमान 28 ते 32 डिग्री से. ग्रेड राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या: