Pune Water Cut : पुणे महानगरपालिकेने (PMC) 10 ऑगस्ट रोजी (Pune Water Cut) शहरातील अनेक भागांसाठी पाणीकपात रद्द केली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ लिमिटेड (MSEDCL) पार्वती जल केंद्राच्या देखभालीचे काम असल्यामुळे पाणी कपात कऱण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी महावितरणशी चर्चा केल्यानंतर महापालिकेने पाणी पुरवठा या गुरूवारी बंद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ लिमिटेड (MSEDCL) पार्वती जल केंद्राच्या देखभालीचे काम करणार होते. त्यामुळे नमूद भागात 10 ऑगस्टला पाणीपुरवठा होणार नाही, असं सांगण्यात आलं होतं. 


या भागात 10 ऑगस्टला पाणीकपात होणार होती:-


पार्वती एमएलआर टँक क्षेत्र:


गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ, इ.


पार्वती एचएलआर टाकी क्षेत्र:


सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर, इ.


पार्वती LLR टाकी क्षेत्र:


शहरातील सर्व पेठ परिसर, दत्तवाडी, राजेंद्रनगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट इ.


SNDT MLR टाकी क्षेत्र:


एरंडवणे, कर्वे रोड, लॉ कॉलेज रोड, भांडारकर रोड, हॅपी कॉलनी, मयूर कॉलनी, सहवास सोसायटी परिसर इ.


चतुरश्रृंगी टाकी क्षेत्र:


औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ, चिखलीवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, इत्यादी 


लष्कर जल केंद्र परिसर:


लष्कर परिसर, पुणे स्टेशन, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, रेसकोर्स परिसर, वानवडी, हडपसर, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, इ.


वडगाव जल केंद्र क्षेत्र:


हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पाथर, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, इ.


पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली


पुण्यात झालेल्या पावसामुळे पुणेकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पुणेकरांची पाणीकपातीपासून सुटका झाली आहे. 28 दिवसांत पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 15 टीएमसी पाणीसाठ्याची भर पडली आहे. दरम्यान, पुण्याला वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये जमा झाल्यानंतर पुण्यातील पाणीकपातीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुणेकरांना पूर्णवेळ पाणी मिळणार आहे.  पुण्यातील घाट विभाग आणि पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Jalna News : अखेर आजपासून जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर; मराठवाड्यातील पाचवी महानगरपालिका