पुणे : पुण्यामधील कोंढवा परिसरातील आल्कन या सोसायटीची भिंत कोसळून 15 मुजरांचा मृत्यू झाला आहे. सोसायटीची कंपाऊंड वॉल शेजारी उभारण्यात आलेल्या मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्यांवर कोसळली. या ठिकाणी मोठ्या बांधकामासाठी पोकलेन मशीनच्या साहाय्याने जमिनीत खोदकाम सुरु होते. त्याला लागूनच बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांच्या झोपड्या होत्या. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे आणि शेजारी सुरु असलेल्या खोदकामामुळे सोसायटीची भिंत कोसळली. ज्यामधे 15 मजूर आणि त्यांची कुटुंबं अडकली. आतापर्यंत 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

कपाऊंडची भिंत बांधतांना बांधकाम व्यावसायिकाने निष्काळजीपणा केला असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. तसेच खोदकाम करणाऱ्या कंत्राटदारानेदेखील मजुरांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता त्यांना कंपाऊंडच्या बाजूला राहण्यासाठी निवारा करुण दिला होता. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, असी मागणी नागरिक करत आहेत.

याप्रकरणी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोंढवा दुर्घटनेत दोषी असणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील 24 तासांच्या आत याप्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

पाहा पालकमंत्री चंद्रकांत पाटील काय म्हणाले?



याप्रकरणी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्याशी माध्यमांनी बातचित केली. यावेळी टिळक यांनी दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नसल्याची ग्वाही दिली. टिळक म्हणाल्या की, कंपाऊंड शेजारी केलेलं खोदकाम बेकायदेशीर असेल तर त्याला परवानगी कोणी दिली? कोणकोणत्या नियमांचं उल्लंघन केलं गेलं? याची चौकशी करुन कठोर कारवाई करु.

पुण्यात भिंत कोसळून 17 मजुरांचा मृत्यू, जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया | ABP Majha



बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे 15 लोकांचा जीव गेला आहे. त्यामुळे बिल्डरसह महापालिकेतल्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोरातली कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी माजी आमदार महादेव बाबर यांनी केली आहे. घटनास्थळी पाहणी करायला आले असताना त्यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली.

पुण्यात मृत्यूचं तांडव, कोंढव्यातील माजी आमदार महादेव बाबर यांची प्रतिक्रिया | ABP Majha