Pune Visarjan Miravnuk 2023 Live updates: लाखो पुणेकर, मुसळधार पाऊस पण मिरवणुकीचा जल्लोष कायम; मानाच्या पहिल्या गणपतीचं परंपरेनुसार विसर्जन
Pune Visarjan Miravnuk 2023: दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. पुण्यातील मिरवणुकीचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
Pune Ganesh Visarjan 2023 : दगडूशेठ गणपतीचं यंदा अनंत चतुर्दशीलाच विसर्जन झालं. आता हीच परंपरा यापुढं कायम ठेवू, असा संकल्प ही आज करण्यात आलाय.
Pune Ganesh Visarjan 2023 : मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचे 6 वाजून 32 मिनिटांनी विसर्जन झाले. डेक्कन परिसरातील महापालिकेच्या हौदात विसर्जन करण्यात आलं.
Pune Ganesh Visarjan 2023 : पुण्याचा मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचं विसर्जन 5 वाजून 55 मिनिटांनी करण्यात आलं. पाचांळेश्वर घाटावर या गणपतीला निरोप देण्यात आला.
Pune Ganesh Visarjan 2023 : मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं 5 वाजून 11 मिनिटांनी विसर्जन झालं. पालखीत दाखल होत मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली होती. अखेर अनेकांनी तांबडी जोगेश्वरी बाप्पाला साश्रु नयनांनी निरोप दिला.
Pune Ganesh Visarjan 2023 : पुण्याचा मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती पाच वाजता अल्का टॉकीज चौकात दाखल झाला आहे. काही वेळात या गणपतीचं विसर्जन होईल.
Pune Ganesh Visarjan 2023 : पुण्यातील ग्रामदैवत आणि मानाच्या पहिला कसबा गणपतीचं विसर्जन थाटामाटात कऱण्यात आलं. नदी पात्रातील हौदात पारंपरित पद्धतीने 4 वाजून 35 मिनिटांनी विसर्जन करण्यात आलं.
Pune Ganesh Visarjan 2023 : पुण्याचा श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दिमाखदार मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. 'श्री गणाधीश रथात दिमाखात मिरवणूक निघणार आहे.
Pune Ganesh Visarjan 2023 : पुण्यात काही परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. वारजे, कोथरुड या परिसरातील मिरवणुकीत कार्यकर्ते भिजत बाप्पाला निरोप देताना दिसत आहे.
Pune Ganesh Visarjan 2023 : मानाचा पहिला गणपती कसबा गणपती अलका चौकात अखेर दाखल झाला आहे. काही वेळात या गणपतीचं विसर्जन करण्यात येणार आहे.
Pune Ganesh Visarjan 2023: केसरीवाडा गणपती निघताना चेंगराचेंगरी झल्याचं चित्र पाहायला मिळालं.दोरीवरून उद्या मारून भाविक दर्शन घेताना दिसले. त्यामुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
Tulshibaug Ganpati: मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकात दाखल झाल आहे. तुळशीबाग ढोल ताशा पथकाकडून शिव तांडव वादन सादर करण्यात येणार आहे. शंकराच्या जटा परिधान करत तुळशीबाग मंडळाचे कार्यकर्ते बेलबाग चौकात आले आहे.
Pune Ganesh Visarjan 2023: पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकींना सुरूवात झाली आहे. बेलबाग चौकातून मिरवणूक सुरूवात होत असताना मुस्लीम बांधवाकडून मानाच्या पाचही गणपतींचं स्वागत केलं जातं. गेल्या 22 वर्षांपासून लाडक्या बाप्पाला अरबी शाल आणि अत्तर लावून स्वागत केलं जात.
Pune Ganeshotsav 2023 : पुण्यात गणरायाच्या वैभवी मिरावणुकांना जल्लोषात सुरुवात झाली आहे. ढोल ताशांच्या गजराने पुणे दुमदुमले आहे. मानाच्या गणपतीची शिस्तबद्ध मिरवणुका आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी पुणेकरांनी पुण्यात गर्दी केली आहे.पुण्यात वैभवी विसर्जन मिरावणुकांना सुरुवात झाली आहे.मानाचा पहिला गणपती असलेला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा वादक पथकाने केलेल्या शिस्तबद्ध शिस्तबद्ध वादनाने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. हा जल्लोष पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.
Pune Ganeshotsav 2023 : पुण्याचा राजा आणि मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम थोड्याच वेळात बेलबाग चौकात येणार आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून बेलबाग चौकात गुलालाची मोठी उधळण केली जात आह फुलांच्या "रामराज्य" रथात पुण्याचा राजा विराजमान झाला आहे.
Pune Ganeshotsav 2023 : बेलबाग चौकात मुस्लिम बांधवांकडून गेली 22 वर्ष झालं पहिल्या पाच मानाच्या गणपतीचे स्वागत केलं जातं. यावेळी मुस्लिम बांधवांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. लाडक्या बाप्पाला अरबी शाल आणि अत्तर लावून पाच मनाच्या गणपतीचे स्वागत केलं जाते.
Pune Ganeshotsav 2023 : मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुलालाची उधळण करण्यात येत आहे. मंडळाचे कार्यकर्तेदेखील जल्लोषात सहभागी झाल्याचं दिसत आहे.
Pune Ganeshotsav 2023 : मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती बेलबागकडे मार्गस्थ झाला आहे. पारंपरिक पालखीत दिमाखात तांबडी जोगेश्वरी गणपती मार्गस्थ होताना दिसत आहे. सध्या जिवंत देखावा, वादन, पारंपरिक खेळ सुरू आहेत. काहीच वेळात बेलबाग चौकात दाखल होणार आहे.
Pune Ganeshotsav 2023 : पुण्यातील बेलबाग चौकात मोठ्या जल्लोषात ढोल ताशा वादनाला सुरुवात झाली आहे. अनेक ढोल ताशा पथक हळूहळू या चौकात दाखल होत आहे. हे वादन पाहण्यासाठी तरुणांनी तुफान गर्दी केली आहे.
Pune Ganeshotsav 2023 : पुण्यातील मुख्य मिरवणुकीला सुरुवात 10:30 वाजता सुरुवात झाली. मंडईतील संपूर्ण परिसर भाविकांनी आणि ढोल वादकांनी गजबजून गेला आहे. सगळे ढोल वादक ढोल वादन करण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे.
Pune Ganeshotsav 2023 : शेकडो भाविक अन् बाप्पाचा जल्लोष करत पुण्यात मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मंडई परिसरात कसबा गणपतीची आरती करत या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.
Pune Ganeshotsav 2023 : मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीदेखील रथावर विराजमान झाला आहे. मोठ्या संख्येने व्यापारी या ठिकाणी एकत्र आले आहेत.
Pune Ganeshotsav 2023 : पुण्याचा मानाचा दुसरा तांबडी (Pune Ganeshotsav 2023) जोगेश्वरी उत्सव मंडपातून बाहेर पडत आहे. मोठ्या संख्येने पुणेकर मंडपात एकत्र आले आहे. या वर्षी मिरवणुका लवकर संपवण्याकडे सगळ्या मंडपांचा कल आहे. त्यामुळे सगळ्या मंडळांनी तशी तयारी केली आहे.
Pune Ganeshotsav 2023 : पुण्यातील मंडळांमध्ये मतमतांतर नाहीत, लवकरात लवकर विसर्जन पार पाडणार, असा दावा कसबा गणपती अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी केला आहे. मागील दोन दिवसांपासून विसर्जन मिरवणुकीवरुन पुण्यातील मंडळांमध्ये मतभेद बघायला मिळाले. मिरवणुकीत सहभागी होण्याच्या मंडळांच्या क्रमांकावरुन काही प्रमाणात वादही बघायला मिळाला होता.
Pune Ganeshotsav 2023 : हिन्दुस्थानातील पहिला गणपती असलेला भाऊ रंगारी गणपती जवळ मोठ्या जल्लोषात शंख वादन करण्यात आलं. केशव शंख पथकाने हे वादन केलं. मागील सात वर्षांपासून हे पथक पुण्यात वादन करतात.
Pune Ganeshotsav 2023 : पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती मंडईच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. शेकडो लोकांनी यावेळी गर्दी केली आहे.
Pune Ganeshotsav 2023 : पुण्याच्या मिरवणुकीला काही वेळात (Pune Ganeshotsav 2023) सुरुवात होणार आहे. मात्र त्यापुर्वी दगडूशेठ मंदिराबाहेर केरळमधील प्रसिद्ध चंडा वादन करण्यात आलं. देवाला झोपेतून उठवण्यासाठी आणि देवाला झोपवण्यासाठी हे वादन केरळमध्ये केलं जातं. मागील तीन वर्षांपासून केरळमधील वादक विसर्जन मिरवणुकीत हे वादन करत असतात.
Kasaba Ganpati: पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जनासाठी उत्सव मांडवातून बाहेर पडेल आणि मंडईत पोहचेल. तिथून मानाच्या गणपती विसर्जनाची मुख्य मिरवणूक सुरू होईल.
Pune Ganeshotsav 2023 : मागील तीन महिन्यांपासून (Pune Ganeshotsav 2023) ढोल ताशा पथकांचा सराव सुरु होता. या हजारो वादक विसर्जन मिरवणुकीच्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते. त्यामुळे हजारो वादक पुण्याच्या मध्यवर्ती भागात वादनासाठी एकत्र जमले आहेत. बेलबाग चौकात, लक्ष्मी रस्त्यावर आणि प्रत्येक मानाच्या आणि महत्वाच्या गणपतीसमोर ढोल ताशा पथकं वादनासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Pune Ganeshotsav 2023 : पहाटेपासूनच गणेश मंडळांनी विसर्जनाची तयारी करायला सुरुवात केली आहे. टप्याटप्यात मानाच्या गणपती मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. सकाळी 9 वाजचा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील या मिरवणुकींमध्ये सहभागी होणार आहे. त्यानंतर अनेक नेते मंडळी मिरणुकीत सहभागी होणार आहेत.
Dagdusheth Ganpati: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा उत्सव मंडपातून मंदिराकडे रवाना झाले. दक्षिण भारतीय पारंपरीक वादक वाजवून रवाना झाले.
पार्श्वभूमी
पुण्यातील बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका ही एक पर्वणीच असते. मानाचे बाप्पा वाजत-गाजत पुढे पुढे सरकत असताना, असंख्य भाविकांची मांदियाळी निरोप देण्यासाठी उपस्थित असते... या काळात पोलीसही चोख बंदोबस्त ठेवतात... यंदा मात्र गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यावरून पुण्यातील महत्वाच्या गणेश मंडळांमध्ये मतभेद दिसून येतायत. त्यामुळं पुण्यातील विसर्जन मिरवणूक व्यवस्थित आणि वेळेत पार पाडण्याचं आवाहन पुणे पोलिसांसमोर असणार आहे.
पुण्यातील गणेशोत्सव जेवढा खास असतो तेवढीच विसर्जन मिरवणूक देखील विशेष असते . सकाळी दहा वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानांत पाच मानाचे गणपती लक्ष्मी रस्त्यावर दाखल होतात . संध्याकाळपर्यंत मानाच्या गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर इतर गणपती मंडळं पोलिसांनी ठरवून दिलेल्या क्रमाने लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात . मात्र दरवर्षी विसर्जन मिरवणुक पार पडण्याचा वेळ वाढत चाललाय . मागील वर्षी काही गणेश मंडळांनी अलका चौकातून विसर्जन मिरवणूक पुढे नेण्यास कित्येक तास लावल्यानं दगडूशेट हलवाई गणपतीला विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यास दुसरा दिवस उजाडला होता . त्यामुळं यावर्षी दुपारीच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊ असं जाहीर केलंय .
मात्र पुण्यातील भाऊ रंगारी , बाबू गेनू , मंडई आणि राजाराम गणेश मंडळाने मात्र आपण ठरलेल्या क्रमानुसार संध्यकाळीच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊ अशी भूमिका घेतलीय . विसर्जन मिरवणुकीसाठी या गणेश मंडळांकडून सुंदर रथ तयार केले जातात आणि त्या रथांना आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते . मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यास मध्यरात्र उलटून जाते . काही मंडळांना तर दुसरा दिवस उजाडतो . त्यामुळं अनेकदा मंडळा - मंडळांमध्ये तणावाची परिस्थिती देखील निर्माण होतेय . मात्र ठरलेला क्रम मोडल्यास आणखी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्यानं आपण नेहमीप्रमाणेच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊ असं पुण्यातील प्रमुख मंडळांनी म्हटलंय . मात्र कुठल्या गणेश मंडळाने विसर्जन मिरवणुकीत कधी सहभागी व्हायचं हे ठरवण्याची जबादारी पोलिसांची असते . त्यामुळं पोलिसांच्या भूमीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. विसर्जन मिरवणुकीचे सगळे नियोजन पूर्ण झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय .
मागीलवर्षी काही गणेश मंडळांनी अलका चौकात ठाण मांडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती . तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांना स्वतः रस्त्यावर उतरून विसर्जन मिरवणूक मार्गस्थ करावी लागली होती . या विलंबामुळं इतर मंडळांनी नाराजी व्यक्त केली होती . त्यामुळं यावेळी विसर्जन मिरवणुक वेळेत पार पाडण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे .
हिंदू धर्मशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या आधी गणेशाचं विसर्जन होणं अपेक्षित असतं . मात्र गणेशोत्सवाच्या नऊ दिवसांत सगळे विधी आणि सोहळे यथासांग पार पडणारी अनेक मंडळ दहाव्या विसर्जनाच्या दिवशी मात्र उन्मादी अवस्थेला पोहचतात . पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत गेली काही वर्ष त्यामुळेच अनेकदा तणावाचं वातावरण निर्माण होत . ती टाळण्याची जबाबदारी या गणेश मंडळांची तर आहेच पण सर्वात मोठं कर्तव्य आहे ते पोलिसांचं . पुणे पोलीस बोटचेपी भूमिका घेतात की नियमांवर बोट ठेवतात यावर पुण्यातील विसर्जन मिरवणूक कशी पार पडणार हे ठरणार आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -