पुणे : पुण्यातील लॉकडाऊन आजपासून उठवण्यात आला आहे. शहरात शुक्रवारपासून (24 जुलै) लॉकडाऊन नसेल पण दहा दिवसांपूर्वी सारखी सर्व प्रकारची सूटही नसेल असं पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केलं आहे. लॉकडाऊन उठवताना काही निर्बंध आम्ही कायम ठेवणार आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. काही गोष्टींबाबतचे निर्बंध वगळता 14 जुलैच्या आधीसारखीच पुण्यात लोकांना त्यांची कामे आणि व्यवसाय करण्यासाठी परवानगी असेल.


निर्बंध घालण्यात आलेल्या बाबी पुढीलप्रमाणे :

  • पुण्यातील दुकानं सकाळी 9 ते रात्री 7 या कालावधीत सुरू राहणार

  • रात्री 9 ते पहाटे 5 या कालावधीत अत्यावश्यक सेवेसाठी काम करणारे लोक वगळता इतर कोणालाही बाहेर पडता येणार नाही

  • पुण्यात येथून पुढे लग्न समारंभ आणि अंत्यविधीप्रसंगी वीस लोकांनाच उपस्थित राहता येईल


पुणेकरांना कशाची मुभा असेल?

  • प्रतिबंधित क्षेत्राबाहेर सार्वजनिक ठिकाणी आणि मैदानांवर व्यायाम करता येईल. धावणे, सायकलींग करता येईल.

  • मात्र जीम बंद राहतील.

  • सकाळी 5 ते 7 या वेळेत व्यायाम करता येणार

  • लहान मुलांसोबत मोठी व्यक्ती हवी , मैदानांवर गर्दी करता येणार नाही

  • व्यायामाची सामायिक उपकरण वापरता येणार नाहीत (ओपन जिम)

  • दुकाने पी1 पी2 प्रमाणे सुरू राहतील

  • खाजगी कार्यालय 10 टक्के किंवा 15 जण यापैकी जे अधिक तितक्या लोकांना बोलवून कामकाज करता येणार आहे.

  • हॉटेल्स, मॉल जीम, व्यापारी संकुल, पोहण्याचे तलाव बंदच राहणार

  • हॉकर्सना व्यवसाय सुरू करता येणार

  • पार्सल, कुरियर सुरू

  • घरमालकाची परवानगी असल्यास घरेलू कामगार , ज्येष्ठ रूग्ण मदतनीस (प्रतिबंधित क्षेत्राबाहेर)

  • सगळीकडे मास्क वापरणं बंधनकाराक

  • ज्येष्ठ नागरिकांना विनाकारण बाहेर पडता येणार नाही


कोविड रुग्णालयावर वॉच ठेवण्यासाठी सीसीटीव्ही 

डॉक्टरांवर लक्ष ठेवण्यासाठी कोरोना सेंटरमधे आम्ही सीसीटीव्ही बसवतो आहोत . या सीसीटीव्हीचे फुटेज प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच पाहण्यासाठीच उपलब्ध असेल. कोरोना सेंटरमधे डॉक्टर येत आहेत का ? किती वाजता आणि किती वेळासाठी येत आहेत याची माहिती मिळणं यामुळे शक्य होणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यानी म्हटलयं. सिनियर डॉक्टर सेंटरला जात आहे का? आणि तेथील परिस्थिती काय होती हे समजावे यासाठी सीसीटीव्ही बसवतो आहोत. हे सीसीटीव्ही फुटेज सिव्हील सर्जन, प्रशासकीय अधिकारी यांना पाहण्यासाठी उपलब्ध असेल असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.

Pune Merchant | पुण्यातील व्यापारी महासंघाचा पुन्हा लॉकडाऊनला विरोध, सम-विषम पद्धतीबाबत व्यापाऱ्यांची नाराजी