Pune Sanjay Rathod: शिंदे-फडणवीस सरकरमध्ये शिंदे गटातील नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी मंत्रिपद देण्यात आलं. त्यांच्या या मंत्रिपदावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. मविआमध्ये असताना एका तरुणीच्या मृत्यूप्रकरणात सहभागी असल्याचे आरोप भाजपतर्फे करण्यात आल्याने त्यांना मंत्रीपद गमवावे लागले होते. तरुणीच्या मृत्यूप्रकरणाचा संजय राठोडांना क्लीन चिट देणारा रिपोर्ट समोर आला आहे. त्यात या प्रकरणात पोलिसांचा तपास संशयास्पद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रिपोर्टमध्ये काय़ आहे?
तरुणीच्या मृत्यूप्रकरणी संजय राठोडांना (Sanjay Rathod) क्लीन चिट देणारा रिपोर्ट समोर आला आहे. त्यात अनेक बाबी स्पष्ट होत आहे. पुण्यातील वानवडी भागात 21 वर्षीय तरुणीचा 8 फेब्रुवारी 2021 ला संशयास्पद मृत्यु झाला होता. या प्रकरणी सुरुवातीला आकस्मित मृत्यु अशी नोंद करण्यात आली. मात्र वर्षभारच्या तपासानंतर पुणे पोलीसांनी एप्रिल 2022 मधे या तरुणीचा मृत्यु हा आत्महत्या किंवा घातपात असल्याच म्हणत वर्षभराच्या तपासानंतर पुणे पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. मात्र त्या तरुणीला हे टोकाच पाऊल उचलण्याची वेळ का आली? याचा पोलीसांच्या या रिपोर्टमधे कुठेही उल्लेख नाही. संबंधित तरुणीसोबतच्या ऑडिओ रेकॉर्डिंग्ज या आपल्याच असल्याचं आणि ती आपल्याशी परिचित असल्याच संजय राठोड यांनी मान्य करून देखील पोलीसांनी संजय राठोड या तरुणीच्या मृत्युला कारणीभूत आहेत का? याचा तपास केला नाही. त्यामुळे हा तपास अपूर्ण ठरला आहे.
त्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पोलिसांना संबंधित तरुणीच्या मृत्यूचा तपास केला. पुणे पोलिसांनी या मृत्यूचं कारण अपघात किंवा आत्महत्या असं दिलं होतं. आत्महत्या असेल तर आत्महत्येचं कारण पुणे पोलिसांनी शोधण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे हा तपास संशयास्पद ठरला आहे. नव्या सरकारमध्ये संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आलं. त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या मंत्रिपदावर आक्षेप घेतला. संजय राठोड यांना मंत्रिपद दिलं जाणं दुर्दैवी असल्याचं चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.