Pune Traffic : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे (Pune Traffic) विद्यापीठासमोरील चौक सिग्नल फ्री करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. या चौकात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात मेट्रोचे काम वेगाने सुरू आहेत. विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या खांबांचे काम पूर्ण झाले आहेत. आता येथील उड्डाण पुलाच्या कामाचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी मेट्रोकडून अतिरिक्त बॅरिकेडिंग केले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.
पुण्यातील शिवाजीनगरकडून येणारा गणेश खिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता इथे एकत्र येतात तर दुसऱ्या बाजूने पाषाण रस्ता, बाणेर रस्ता आणि औंध रस्ता या चौकात येऊन मिळतात. पुढे गणेश खिंड आणि सेनापती बापट रस्त्यावरुन येणाऱ्या वाहनांना पाषाण, बाणेर किंवा औंध अशा कोणत्याही भागात जायचे असेल तर पाषाण रस्त्याने प्रवास करावा लागणार आहे. औंधला जाणाऱ्या वाहनांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून वळसा घेऊन औंधला जावे लागणार आहे तर बाणेरला जाणाऱ्या वाहनांना पाषाण रस्त्यावरील अभिमानश्री सोसायटीपासून उजवीकडे वळून बाणेर रस्त्यावर यावे लागणार आहे. सोमवारपासून पुण्यातील वाहतुकीत हे बदल करण्यात येणार आहेत.
असा असेल वाहतुकीत बदल
-बाणेर आणि औंध रस्त्याने विद्यापीठ चौकात येणारी वाहने विना सिग्नल शिवाजीनगरकडे डाव्या लेनने जाणे प्रस्तावित आहे. विद्यापीठ चौक येथे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी वेळ देण्यात येत आहे.
-गणेशखिंड रस्त्याने सेनापती बापट रस्त्याकडे जाण्यासाठी यापूर्वी कॉसमॉस बँक येथे ‘यू टर्न’ देण्यात आला होता. तो ‘यू-
-टर्न’ बंद करून सेनापती बापट रस्ता जंक्शन येथून उजवीकडे वळण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
- सेनापती बापट रस्त्याने (चतुःश्रृंगी मंदिर) येथून विद्यापीठ चौकाकडे येणारी सर्व वाहतूक सेनापती बापट रस्ता जंक्शन येथून डावीकडे वळून सरळ पाषाण रस्त्याकडे वळविण्यात येणार आहे.
औंधकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग-
पर्यायी वर्तुळाकार मार्ग 1: गणेशखिंड व सेनापती बापट रस्त्याकडून पुणे विद्यापीठ, चतुःश्रृंगी पोलिस ठाणे, कस्तुरबा गांधी वसाहतीकडे जाणाऱ्या वाहनांनी पाषाण रस्त्याने सिंहगड गेट (पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालय) येथून उजवीकडे वळून बाणेर रस्त्याने उजवीकडे वळून सरळ विद्यापीठ चौकातून डावीकडे वळून औंधकडे जावे.
पर्यायी मार्ग 2 : पाषाण रस्त्याने अभिमानश्री सोसायटी, पाषाण रस्ता जंक्शन, उजवीकडे वळून अभिमानश्री सोसायटी, बाणेर रस्ता जंक्शन उजवीकडे वळून बाणेर रस्त्याने उजवीकडे वळून सरळ विद्यापीठ चौकातून डावीकडे वळून औंध कडे जाता येईल.
पर्यायी मार्ग 3 : सेनापती बापट रस्त्याकडून औंधकडे जाणाऱ्या वाहनांनी पाषाण रस्त्याने अभिमानश्री सोसायटी, पाषाण रस्ता जंक्शन, उजवीकडे वळून अभिमानश्री सोसायटी. बाणेर रस्ता जंक्शन डावीकडे वळून बाणेर फाटा, उजवीकडे वळून सर्जा हॉटेल कॉर्नर डावीकडे वळून क्रोमा मॉल रस्त्याने किंवा बाणेर फाटा उजवीकडे वळून आय. टी. आय. रस्ताने परिहार चौक मार्गे इच्छितस्थळी जावे.
राजीव गांधी पुलाकडून गणेशखिंड रस्त्याकडे येणाऱ्यांना पर्यायी मार्ग
-ब्रेमेन चौकातून डावीकडे वळून स्पायसर कॉलेज रस्ता, आंबेडकर चौक, साई चौक, उजवीकडे वळून खडकी पोस्टे रेल्वे अंडरपास डावीकडे वळून चर्चे चौक, जुना पुणे-मुंबई महामार्गाचा वापर करता येईल.
- पुणे स्टेशन, कोरेगाव पार्क, मुंढव्याकडून औंधकडे जाणाऱ्या वाहनांनी इंजिनीअरिंग कॉलेज उड्डाणपुलावरून, वाकडेवाडी, पोल्ट्री फार्म चौक, चर्च चौक, डावीकडे वळून खडकी पोलिस ठाणे अंडरपास, डावीकडे वळून मरिआई मंदिर, उजवीकडे वळून गोगादेव चौक, उजवीकडे वळून जे टाइप (फुटबॉल ग्राउंड), उजवीकडे वळून साई चौक, डावीकडे वळून आंबेडकर चौक, स्पायसर चौक, ब्रेमेन चौकातून इच्छितस्थळी जावे.