पुणे : पुणेकरांसाठी (Pune)महत्वाची बातमी आहे. पुण्यात बुधवारी (Pune News) काही परिसरात पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे. कोंढवा रोडवरील इस्कॉन मंदिर कान्हा हॉटेलसमोरील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या तातडीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पुणे महापालिकेने 6 मार्च 2024 रोजी पाणीकपात जाहीर केली आहे. ही दुरुस्ती तातडीची असून ती लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. दुरुस्ती कर्मचारी या समस्येकडे लक्ष देत असल्याने रहिवाशांना पाणी पुरवठ्यात व्यत्यय येण्याची तयारी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बुधवार, 6 मार्च 2-24 रोजी दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवार, 7 मार्च 2024 रोजी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
बाधित क्षेत्रांची यादी :
केके मार्केट परिसरबिबवेवाडी (आंशिक)कात्रजकोंढवा बुद्रुकराजीव गांधीनगर (यूपी)सुपर इंदिरानगरकोंढवा बुद्रुक गावठाणलक्ष्मी नगर .
ज्या भागात पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे, ते खालीलप्रमाणे आहेत.
कोंढवा बुद्रुक आणि अप्पर इंदिरानगर परिसर :
साईनगरगजानन नगरकाकडे वस्तीग्रीन पार्कराजीव गांधीनगर (भाग)इस्कॉन मंदिर परिसरकोंढवा बुद्रुक गावलक्ष्मीनगरहगवणे वस्तीअजमेरा पार्कअशरफनगरशांतीनगरसाळवे गार्डन परिसरश्रेयसनगरअंबिकानगरपवननगरतुळजाभवानी नगर सरगमनगरगोकुळनगरसोमनाथनगरशिवशंभोनगरसावकाशनगर गुलमोहर कॉलनीअण्णाभाऊ साठेनगर अप्पर डेपो परिसर महानंदा सोसायटी गुरुकृपा कॉलनी श्रीकृष्ण कॉलनीश्रीकुंजनगर
तळजाई झोन :
पुनईनगरबालाजीनगर (भाग)शंकर महाराज मठ परिसर अप्पर व लोअर इंदिरानगरमहेश सोसायटी परिसरमानस सोसायटी परिसर, पद्मकुंजराजयोग सोसायटीलोकेश सोसायटी शिवशंकर सोसायटी कुंभार वस्तीदामोदरनगर प्रोजेक्ट सोसायटी हस्तिनापूरमनमोहन पार्क तोडकर रेसिडेन्सी स्टेट बँक कॉलनी महालक्ष्मी नगर पद्मजा पार्कलेकटाउनचैत्रबन कॉलनीअप्पर आणि सुपर इंदिरानगर परिसरचिंतामणीनगर भाग 1 व 2
पुण्यात पाणीकपात नाही!
भर उन्हाळ्यात पुणेकरांची पाणीकपात टळली आहे. कालवा समितीच्या बैठकीत पुण्यात पाणीकपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज कालवा समितीची बैठक घेतली. या बैठकीत धरण साखळीतील पाणी साठ्याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पाणीकपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला.मागील काही महिन्यांपासून पुणेकरांवरची पाणी कपातीची टांगती तलवार होती. पाणीकपात होणार आणि भर उन्हाळ्यात पुणेकरांना पाणीकपातीच्या संकटाला सामोरं जावं लागणार असल्याचं चित्र होतं. पंचवीस वर्षातील सर्वात कमी पाऊस यावेळी पुणे जिल्ह्यात धरण क्षेत्रात झाला होता मात्र तरीही यावेळी पुणेकरांना पाणी कपातील सामोरे जावे लागणार नाही.
इतर महत्वाची बातमी-