Pune Weather Update : पुण्यातील घाट विभागात गेल्या काही दिवसांपासून (Pune Weather Update) मुसळधार पाऊस सुरू असताना, ताम्हिणी घाट आणि लोणावळा काल (22 जुलै) पुन्हा चांगला पाऊस झाला. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, ताम्हिणी घाट परिसरात गेल्या 24 तासात 230 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर लोणावळ्यात 137 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच मावळातील शिरगाव येथे 170 मिमी पाऊस झाला.
ग्रामीण भागात जोरदार पाऊस, शहरात प्रतिक्षा
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीपातळी गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. हवामान खात्याने 23 जुलैला जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर 24, 25 आणि 26 जुलैला यलो अलर्ट जारी केला आहे.
वाहनं हळू चालवा...
घाट परिसरात चांगला पाऊस सुरु आहे. त्यामुळे घाट परिसरात जाताना काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. त्यासंदर्भात त्यांनी ट्विटही केलं आहे. पुणे घाट भागात मुसळधार ते अतीमुसळधार पाउस सुरु आहे. यामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत होऊन प्रवासाचा वेळ वाढल्याचं दिसत आहे. कच्च्या रस्त्यांचे नुकसान झाले आहे. अनेक परिसरात भूस्खलन होण्याची शक्यता आहे. वाहतूकी संदर्भात जारी केलेल्या रहदारी सूचनांचे पालन करा. घाट भागात जाणे टाळा. वाहने हळू चालवा, असं आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना ट्विटच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.
पुढील काही दिवस पुण्यातील वातावरण कसं असेल?
23 जुलै : आकाश सामान्यतः ढगाळ राहून दुपारी / संध्याकाळी आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता, हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. (घाट विभागात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
24 जुलै : आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. (वाट विभागात मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता).
25 जुलै : आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
26 जुलै : आकाश सामान्यतः ढगाळ राहून दुपारी / संध्याकाळी आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
27 जुलै : आकाश सामान्यतः ढगाळ राहून दुपारी / संध्याकाळी आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
28 जुलै : आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
29 जुलै : आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
Mumbai Yellow Alert : मुंबईला पावसाचा यलो अलर्ट, दोन दिवस पावसाचा जोर वाढणार