पुण्यात जात पंचायतीच्या छळामुळे वृद्धाची आत्महत्या, चौघांवर गुन्हा
एबीपी माझा वेब टीम | 29 Aug 2016 12:48 PM (IST)
पुणे : पुण्याच्या साईनाथनगरमध्ये जात पंचायतीच्या छळाला कंटाळून एका वृद्धाने आत्महत्या केली आहे. अरुण नायकू यांच्या आत्महत्येप्रकरणी 4 जातपंचांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वर्षापूर्वी लिंगायत गवळी समाजातील मुलाच्या आंतरजातीय विवाहाला नायकू यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे त्यांना जातीबाहेर करण्यात आलं. त्यानंतर रविवारी रात्री गवळीपाडामध्ये जात पंचांची बैठक होती. या बैठकीला अरुण नायकूंनी हजेरी लावली आणि बहिष्कार मागे घेण्याची विनंती केली. यावेळी जातपंचांनी त्यांना अपमानित करुन बैठकीतून हाकलून दिलं. नायकू यांनी हा सगळा प्रकार आपल्या मुलाला आणि सुनेला सांगितला. पहाटेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.