पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वे. निसर्गाचं लेणं लाभलेला हा परिसर. मात्र त्यावरील होणाऱ्या अपघातांमुळेच तो कायम चर्चेत असतो.


 

पावसाळा सुरु झालाय आणि त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचं सौंदर्य पुन्हा एकदा खुलून आलंय. एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी खास ड्रोननं टिपलेलं हे सौंदर्य आम्ही दाखवतोय.

 

अतिशय विहंगम अशी ही दृश्यं तुमच्या आमच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी आहेत.



दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आता ड्रोन कॅमेराद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. राज्य सरकारने गेल्या महिन्यात यासंबंधी घोषणा केली होती. शनिवारपासून याचे प्रात्यक्षिक खंडाळा घाटाखाली सुरु करण्यात आलं. शनिवार आणि रविवार दोन दिवस हे प्रात्यक्षिक घेण्यात आलं.



वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर 24 तास नजर ठेवली जाणार आहे. एक्स्प्रेस-वेवर लेनची शिस्त मोडणाऱ्यांसह अतिवेगाने वाहने चालवणाऱ्यांवर, चुकीच्या पद्धतीन ओव्हरटेक करणाऱ्यांवर आता चोवीस तास ड्रोनची नजर राहणार आहे.

 

रस्ते विकास महामंडळ, ‘आयआरबी’च्या वतीने एक्स्प्रेस-वेवर चार ठिकाणी ड्रोन तैनात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान लेनची शिस्त मोडणाऱ्या अवजड वाहनांविरोधात कारवाईही करण्यात आली.