Trending Plastic Recycle Video : पर्यावरणासाठी प्लास्टिक अत्यंत हानिकारक आहे. सरकारकडून देखील प्लास्टिकचा वापर करण्यावर निर्बंध घातले गेले आहेत. भारतात अशा अनेक कंपन्या आहेत त्या प्लास्टिक रिसायकल करण्यासाठी नव- नवीन प्रयोग करत असतात. पुण्यातील एका कंपनीने असाच प्रयोग करत चिप्सच्या पॅकेट्सपासून फॅशनेबल सनग्लासेस बनवले आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


कंपनीचे संस्थापक अनिश मालपाणी यांनी आपल्या ट्विटरवर ट्रेंडी रिसायकल केलेले सनग्लासेस तयार केल्याची माहिती दिली आहे. ज्यामध्ये त्यांच्या कंपनीने चीप्सच्या पॅकेटपासून आणि मल्टी-लेयर्ड प्लास्टिक (MLP)पासून सनग्लासेस तयार करण्यामागील संपूर्ण प्रक्रिया दाखवली आहे. टाकाउपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचं हे उत्तम उदाहरण आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये हे आतापर्यंतचे सर्वात अवघड काम असल्याचंही मालपाणी यांनी सांगितल आहे. या कंपनीने दावा केला आहे की हे जगातील पहिले रिसायकल सनग्लासेस आहेत.  


या कंपनीच्या सोशल मीडिया बोयोमध्ये कंपनीमध्ये आणखी काय काय रिसायकल होते हे सांगितलं आहे. या कंपनीमध्ये फक्त चिप्सचे पॅकेटच नव्हे तर इतर सर्व प्रकारच्या प्लस्टिकचे रिसायकल करणं, अशक्य असणारे मल्टी-लेयर्ड प्लास्टिक पॅकेजिंग जसे की चॉकलेट रॅपर्स, दुधाचे पॅकेट, इतर कोणतेही जास्त थरांचे पॅकेजिंग रिसायकल केले जाते. पुण्यातील एका लॅबमध्ये दोन वर्षापासून हे सनग्लासेस बनवणयाची प्रकिया चालू आहे. केवळ रिसायकलच नव्हे तर त्याला अगदी नवीन बनवण्याचा मार्गदेखील शोधला आहे. तसेच या कंपनीमध्ये सनग्लासेसपासून सुरू होणार्‍या मल्टी-लेयर्ड प्लास्टिकमधून चांगले साहित्य काढण्याचा आणि त्यावर प्रक्रिया करून उच्च दर्जाचे साहित्य आणि उत्पादने तयार केले जातात. या मल्टी-लेयर्ड प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करणे अशक्य झाले होते. जागतिक स्तरावर या कचऱ्याचा जवळपास 0 टक्के  पुनर्वापर केला जात आहे. संपूर्ण महासागरात अंदाजे 80 टक्के प्लास्टिक आहे. जगावर ही खूप भीषण परिस्थिती उद्भवलेली आहे.






कंपनीचे संस्थापक अनिश मालपाणी म्हणाले, "हे रिसायकल केलेले सनग्लासेस कदाचित सर्वात टिकाऊ सनग्लासेस असतील. ते दिर्घ काळ टिकणारे आहेत. कारण ते युव्ही पोलराईज, टिकाऊ, ब्लेन्डी आणि आरामदायक आहेत. विषेश म्हणजे आपले सनग्लासेस चिप्सच्या किती पॅकेट वापरुन बनवले आहे हे आपल्याला सनग्लासेसच्या कडेला असलेला क्यू आर QR कोड स्कॅन करुन समजते."