पुणे : शहरातील गुन्हेगारीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसून येत नाहीत, काही दिवसांपूर्वीच पुण्यात एका युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर, आज पुन्हा एकदा पुण्याच्या सिंहगड कॉलेज परिसरातील एका इमारतीजवळ खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एका युवकाला कोयत्याने आणि कुंड्याने मारहाण करत त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. 

Continues below advertisement

सय्यद असे मृत्यू तरुणाचे नाव असून खून झालेल्या युवकाचे वय अंदाजे 20 वर्षांपेक्षाही कमी असल्याची माहिती आहे. खुनाच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

सविस्तर वृत्त लवकरच...

कल्याणमध्ये मोठी कारवाई , गावठी पिस्तुलसह शस्त्रसाठा जप्त

कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाने गावठी पिस्टल, जिवंत काडतुससह, खंजीर, तलवार, चाकू  विक्रीसाठी आणणाऱ्या रोशन झा या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण क्राईम ब्रँच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना एक इसम गावठी बनावटीचे पिस्तूल तसेच घातक शस्त्र विक्रीसाठी घेऊन आला असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाचे पोलीस अधिकारी सर्जेराव पाटील यांनी डोंबिवली पूर्वेकडील देसले पाडा येथील गोकुळधाम टॉवर या इमारतीमध्ये सापळा रचला. सदर आरोपी रोशन झा हा याच इमारतीमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना होती. पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकत ३ गावठी पिस्टल, ३ जिवंत काडतुसे ,दोन मॅक्झिन, एक खंजीर, दोन चाकू ,दोन तलवार अशी घातक शस्त्र जप्त केली आहेत. याप्रकरणी रोशन झा सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्यात .रोशन विरोधात याआधी देखील उल्हासनगर मधील विविध पोलीस ठाण्यात सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान रोशन झा याला स्थानिक राजकीय नेत्यांचा आश्रय असल्याची देखील माहिती समोर येत आहे . दरम्यान  रोशन ने ही शस्त्रे कुठून आणली?कुणाला विकणार होता? याचा तपास सुरू केला आहे

Continues below advertisement

हेही वाचा

शिवसेनेच्या 60 आमदारांविरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार; 1 वर्षानंतर तानाजी सावंतांचा गौप्यस्फोट