पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा  (Sex Racket) पर्दाफाश केला आहे.  पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली असून कारणी सहा तरुणींची सुटका केली आहे. यात चार तरुणी या थाटलंडच्या आहे. या प्रकरणी स्पा मालक व मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशाचं आमिष दाखवून वेश्याव्यावसाय करत असल्याचं समोर आलं आहे. 


मॅनेजर शाहरुख अहमद चौधरी (वय 27, रा. जाधवनगर, मुंढवा मुळ रा. जुनिजान ता. जि. हुजाई, आसाम) आणि स्पा मालक सुरेंद्र जगन्नाथ पाटील (वय 32, रा. सुखवानी रॉयल सोसायटी, विमाननगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 


पुण्यातील कोरेगाव परिसरात ज्वेल स्क्वेअर या ठिकाणी वेश्याव्यावसाय सुरु आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी सापळा रचला आणि पर्दापाश करण्याचं ठरवलं. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने एक फेक ग्राहक पाठवून या ठिकाणी वेश्याव्यावसाय सुरु असल्याची माहिती घेतली. वेश्याव्यावसाय सुरु असल्याची खात्री पटल्यानंतर स्पा सेंटरवर छापा टाकला. यात चार थायलंड आणि दोन आसाममधील तरुणी सापडल्या. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सहा तरुणींची सुटका केली आणि दोघांवर गुन्हा दाखल केला. यात 45 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. 


पुण्यातील अवैध ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर...



सध्या पुणे शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे पुण्यात सध्या पोलिसांनी वेगवेगळ्या उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. त्यात रात्रीच्या वेळी गस्त घालण्यापासून तर खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यावर सापळा रचून छापा टाकण्यापर्यंत पोलीस उपाययोजना करण्यात येत आहे आणि अनेक अवैध व्यवसायावर कारवाई देखील करण्यात येत आहे. मात्र, अवैध व्यावसाय काही बंद होण्याचं नाव घेत नसल्याचं शहरात घडत असलेल्या घटनांवरुन दिसत आहे. 


नागरिकांना  थेट तक्रारी कराव्यात, पोलिसांचे आवाहन



पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. अनेक हायप्रोफाइल प्रकरणे उघडकीस आणली होती. मसाज पार्लर स्पाच्या नावाने चालणाऱ्या व्यवसायांवर करडी नजर ठेवली जाणार असून नागरिकांना असं काही आढळल्यास थेट तक्रारी कराव्यात, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या-


-Dharashiv Lok Sabha : धाराशिवचा तिढा सुटला, तानाजी सावंत एक पाऊल मागे? भाजपच्या आमदाराच्या पत्नीची वर्णी लागण्याची शक्यता


-Ram Satpute : सोलापुरात विमानतळ अन् आयटी पार्क उभारणार, सोलापूर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा शब्द