पुणे : बारामती लोकसभा मतदार संघाच्या (Baramati Loksabha Constituency) महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे(Supriya Suleपुणे दोऱ्यावर आहेत. त्यानी आज राष्ट्रवादीच्या वीज दरवाढी विरोधात असलेल्या आंदोलनाला हजेरी लावली. यावेळी सुप्रिया सुळेंनी रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यावर झालेल्या ट्रोलिंग संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्यासोबतच त्यांनी राज्याची परिस्थिती आणि दुष्काळावरदेखील (Maharashtra Draught) भाष्य केलं आहे. 


सुप्रिया सुळे म्हणाल्या की, विरोधकांनी रवींद्र धंगेकर यांना त्यांच्या शिक्षणावरुन ट्रोल केलं. असं ट्रोल करणं चांगलं नाही मात्र रवींद्र धंगेकर  यांच्या विरोधात भाजपाला बोलायला काहीच नाही, म्हणून ते ट्रोल करत आहेत. 


'लोकांना या देशांमध्ये बदल हवाय. भ्रष्टाचाराला लोक थकले आहेत आणि कंटाळले आहेत. बेरोजगारीला कंटाळले आहे. लोक महागाईला कंटाळले आहेत आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात, कामगारांच्या विरोधात महिलांच्या विरोधातील आहेत. त्यामुळे लोकांना आता बदल हवाय. हा बदल घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत', असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


दुष्काळाकडे सरकारचं दुर्लक्ष!


'राज्यामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघाचे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. धरणात पाणी नाही आहे. दुष्काळासाठी मला काम करायचं आहे. दृष्काळासंदर्भात हे  असंवेदनशील आहे.  दुष्काळाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे मी राजकारणापेक्षा दुष्काळाकडे लक्ष देत आहे', असंही ते म्हणाले. 


महागाईच्या चटक्यांनी पोळलेल्या जनतेला वीज दरवाढीचा शॉक!


महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील सामान्य जनता आजपर्यंतच्या सर्वाधिक महागाईचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत जनतेला महागाईच्या संकटातून दिलासा देण्यासाठी धोरण आखणे हे सरकारचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्रातील फडणवीस - पवार - शिंदे सरकारने मात्र आधीच महागाईच्या चटक्यांनी पोळलेल्या जनतेला वीज दरवाढीचा शॉक दिला आहे. विजेचा किमान स्थिर आकार तसेच प्रति युनिट वीज दर यात वाढ करून फडणवीस - पवार - शिंदे सरकारने एकूण वीज दरात सरासरी 15% वाढ केली आहे, असे आरोप सुप्रिया सुळेंनी केले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या-


-Dharashiv Lok Sabha : धाराशिवचा तिढा सुटला, तानाजी सावंत एक पाऊल मागे? भाजपच्या आमदाराच्या पत्नीची वर्णी लागण्याची शक्यता


-Ram Satpute : सोलापुरात विमानतळ अन् आयटी पार्क उभारणार, सोलापूर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा शब्द


Baramati Loksabha Constituency : 'दादा वहिनी हे तुमचं कुटुंब, आम्हीच इथले उमेदवार'; काटेवाडीतील घरांवरील पाट्यांनी वेधलं लक्ष!