पुणे: पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या (Pune Deenanath Mangeshkar Hospital) हलगर्जीमुळे गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला झाला असल्याचा दावा भिसेंच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी वेगवेगळ्या समित्यांच्या मार्फत सुरु आहे. त्यातील ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना देण्यात आला आहे. हा अहवाल आता एबीपी माझाच्या हाती लागला आहे. त्या अहवालातील निष्कर्षानुसार मंगेशकर रुग्णालयाला क्लीन चिट मिळण्याची शक्यता आहे. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात दोन दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या चौकशी समितीने अहवाल पुणे पोलिसांना दिला. (Pune Deenanath Mangeshkar Hospital)
चौकशी समितीने अहवाल काय म्हटलंय?
इंदिरा आयव्हीएफ (IVF) मध्ये तब्येतीत सुधारणा होत नसताना देखील 4-5 दिवस दाखल करून घेणं चूक होती. तब्येतीत सुधारणा होत नसल्याचं स्पष्ट झालेलं असताना तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात रेफर करायला पाहिजे होतं.
मंगेशकर रुग्णालयात पाच तास थांबवले होते, मात्र या वेळी पैसे घेतले की नाही किंवा हेच कारण होते का? पैसे द्या नाहीतर ट्रीटमेंट करणार नाही, असे प्रश्न होते. याबाबत आरोग्य उपसंचालक यांनी चौकशी करून अहवाल द्यायचा आहे, याची चौकशी आरोग्य उपसंचालक यांनी केली आहे.
अती जोखमीची परिस्थिती असताना मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये नेण्याची गरज होती. मात्र, ते करण्यात आलेले नाही. तिला सूर्या रुग्णालयात नेण्यात आलं. इथे डिलिवरी झाली. मात्र रुग्णालयात कोणताही cardiac specialist उपलब्ध नव्हता. तनिषा भिसेंना हार्ट अटॅकची रिस्क वाढली आणि जवळपास दोन तास सीपीआर देत होते.
सदरील गुंतागुंतीचे रुग्ण होता. मृत्यू मणिपालमध्ये झाला. हा माता मृत्यू असतानाही त्यांनी PM केलेले नाही.ससून रुग्णालयाला त्यांनी मृत्यू झाल्यानंतर कळवणं गरजेच होतं. हे झालेलं नाही. या सगळ्यात IVF सेंटर ची जबाबदारी महत्वाची आहे. त्यांनी लवकर रेफर केलं पाहिजे होता.
पुणे पोलिसांनी पाठवले ससून रुग्णालयाला पत्र
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा अभिप्राय मागितला. ससून रुग्णालयाच्या अहवालातील मुद्द्यांवरून पोलिस संभ्रमात आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ सुश्रुत घैसास यांच्या भूमिकेबद्दल विस्तृत माहिती द्यावी, असे पोलिसांनी ससूनला कळवले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात "मेडिकल निगलिजन्स" या बाबतची टिप्पणी ससून रुग्णालयाने अहवालात मांडली नसून त्याबद्दल स्पष्ट भूमिका मांडावी असे देखील पत्रात नमूद करण्यात आलं आहे. अहवालात ठोस निष्कर्ष आढळून न आल्यामुळे तूर्तास मंगेशकर रुग्णालयाला दिलासा देण्यात आला आहे. वैद्यकीय समितीचा नवीन आणि सुधारित अहवाल कधी येणार याकडे लक्ष लागलं आहे.